करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात लांब हवाई मार्गांपैकी (Success Story) एका मार्गावर विमान उडवणारी झोया अग्रवाल ही पहिली महिला वैमानिक आहे. सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू अशा उत्तर ध्रुवावर जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर झोयाने यशस्वी उड्डाण केले आहे.
कोण आहे कॅप्टन झोया?
झोया अग्रवालने भारताचे नाव जगात उंचावले आहे. तिच्या नेतृत्वाखाली, महिला फ्लाइट इंडिया पायलट टीमने 2021 मध्ये प्रथमच जगातील सर्वात लांब उड्डाण मार्गावर उड्डाण केले आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून बेंगळुरूला ही टीम गेली होती. अशाप्रकारे त्यांनी बोईंग 777 उड्डाण करत उत्तर ध्रुव ओलांडला. 2013 च्या सुरुवातीला, ती बोईंग 777 उडवणारी भारतातील सर्वात तरुण महिला पायलट बनली होती. जोया एअर इंडियामध्ये कॅप्टन आहे.
असा होता अडचणींनी भरलेला प्रवास
झोया अग्रवालचा (Zoya Agarwal) पायलट होण्याचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. तिचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे मुली पायलट होण्याचे स्वप्नही पाहू शकत नाहीत. झोयाने पहिल्यांदा पायलट बनण्याची इच्छा तिच्या आईकडे व्यक्त केली तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. एवढी वेडी मुलगी का जन्माला आली, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांना झोयाचे लग्न लावून द्यायचे होते.
‘पायलट होण्याचा विचार स्वप्नातही केला नव्हता’
जोया अग्रवाल ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जेव्हा ती पायलट बनण्याचे स्वप्न पाहू लागली तेव्हा तिच्यासमोर कोणाचाच आदर्श नव्हता. फ्लाइट डेकमध्ये मुलींच्या प्रवेशाचा विचारही तेव्हा केला जात नव्हता. पण झोयाने हार मानली नाही. तिने अशक्य गोष्ट शक्य करून (Success Story) दाखवली. एकदा ती म्हणाला होती, “पायलट (Pilot) होण्याचा विचार स्वप्नातही मी केला नव्हता. माझा जन्म अशा काळात झाला जेव्हा भारतात मुलींना शिक्षण देण्याऐवजी मुलींचे लग्न लवकर करुन देणे एवढीच विचारसरणी प्रचलित होती. लग्नानंतर माझे आयुष्य मुले आणि कुटुंब सांभाळण्यात जात होते.”
रस्त्यावरील दिव्याखाली बसून केला अभ्यास
जोया अग्रवालचे बालपण संघर्षमय होते. घरातील वीज वारंवार खंडित होत होती. त्यामुळे कधी-कधी तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटखाली बसून अभ्यास करावा लागे. लहानपणापासूनच (Success Story) ती तिच्या शिक्षणासाठी पिगी बँकेत पैसे जमा करत होती. सणासुदीला जे काही पैसे मिळायचे ते ती पिगी बँकेत साठवायची. आपल्या बचतीतून तिने विद्यापीठाचे शिक्षण पूर्ण केले. जोया नेहमी अभ्यासात टॉपर होती त्यामुळे तिच्यातील जिद्द पाहून तिच्या पालकांनी तिला पायलट बनण्याची परवानगी दिली.
लहानपणीचं स्वप्न केलं पूर्ण (Success Story)
जोया वयाच्या 8 व्या वर्षीपासूनच आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहू लागली. आता ती ‘बोईंग 777’ विमाने जगभर उडवत आहे. 2004 मध्ये तिने एअर इंडियासोबत स्वप्नवत उड्डाण सुरू केले. युनायटेड नेशन्समध्ये जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत महिला प्रवक्ता म्हणून कॅप्टन जोया अग्रवालची निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com