Success Story : मंदिरात बसून युट्यूबवरुन केला अभ्यास; या तरुणाने रेल्वेत मिळवल्या दोन नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती;’ हे खरं (Success Story) ठरलं आहे बोन्था तिरुपती रेड्डी या तरुणाच्या बाबतीत.  आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील पोसुपल्ली गावातील 27 वर्षीय तरुणाने कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता रेल्वेत एक नव्हे तर चक्क दोन नोकऱ्या मिळवल्या आहेत. या तरुणाने पहिल्यांदा 2019 मध्ये RRB परीक्षेसाठी अर्ज केला होता. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याला SWR-बंगलोर येथे ग्रेड-IV सहाय्यक म्हणून नोकरी मिळवली आहे.
यूट्यूबवरुन केला अभ्यास
बोंथा तिरुपती रेड्डी हा एका गरीब कुटुंबातील तरुण आहे. कोचिंग क्लास लावून स्पर्धा परीक्षांची तयारी करु शकेल, अशी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत त्याच्याकडे असलेल्या साधनांचा योग्य वापर त्याने केला. त्याला कोणत्याही किंमतीत यश मिळवायचे होते, त्यासाठी (Success Story) त्याने यूट्यूबला आपले माध्यम बनवले आणि यूट्यूबच्या मदतीने त्याने रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने यूट्यूबच्या विविध चॅनेलवर सामान्य ज्ञान, तर्कसंगत आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या इतर विषयांवर व्हिडिओ पाहून परीक्षेची तयारी केली.

अनेक विषयात मिळवली पदवी (Success Story)
बोन्था तिरुपती रेड्डी याने गणित, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान या विषयांसह विज्ञान विषयात पदवी घेतली आहे. पदवीनंतर तिरुपतीने आरआरबी परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR)-बेंगळुरू विभागात ग्रेड-IV असिस्टंट आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क (CCTC) म्हणून दोन नोकऱ्या मिळवल्या आहेत.
अभ्यास करताना केली वडिलांच्या कामात मदत
बोन्था याचे वडील शेती करतात. शेतीतील तुटपुंज्या (Success Story) उत्पन्नावर त्यांचे घर चालते. वडिलांना शेतीच्या कामात मदत व्हावी; यासाठी तो शेतीकामात वडिलांना मदत करुन अभ्यास करत असे. त्याला 2 बहिणी असून काही वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले आहे.

मंदिरात बसून केला अभ्यास
बोन्था यांनी सांगितले की, “माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला कोचिंगसाठी प्रवेश घेवू शकलो नाही. तसेच, माझ्या वडिलांनी शेतीची सर्व कामे एकट्याने करावी असे (Success Story) मला वाटत नव्हते. त्यामुळे मी माझ्या गावात कुटुंबासोबत राहूनच परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.” बोन्था लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी आहे. त्यांनी कुशलतेने शेतीचे काम आणि अभ्यास यात समतोल राखला. घरी पुरेशा सोयी सुविधा नसल्यामुळे, तो त्यांच्या शेताजवळ असलेल्या पॅगोडामध्ये आपली पुस्तके ठेवायचा. त्याच्या मते; “मंदिर हा माझा अभ्यासाचा कोपरा आहे कारण तेथे मोबाईल नेटवर्क चांगले मिळते.”
दररोज 10 ते 12 तास अभ्यास (Success Story)
तिरुपती दररोज 10-12 तास अभ्यास करायचा. तो सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत यूट्यूबवर क्लास करुन नोट्स तयार करत असे. त्याने केवळ अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर केल्याने (Success Story) त्याला कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासला प्रवेश घ्यावा लागला नाही. नोकरी मिळाल्यानंतर आपल्यासारख्या ग्रामीण आणि गरीब कुटुंबातून आलेल्या तरुणांसाठी विधायक  काम करणार असल्याचे त्याने सांगितले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com