करिअरनामा ऑनलाईन । अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) पदार्पण करून नवनवीन विक्रम रचत आहेत. हे तरुण पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसतात. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या तरुणाने बी. टेक पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीमध्ये पदार्पण केले. सध्या तो ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाच्या लागवडीतून वर्षाला खर्च वजा करता वार्षिक 25 लाखांची कमाई करत आहे.
शेतकरी सध्या पारंपारिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणात (Success Story) फळ शेतीकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना फळशेतीमधून इतर पिकांपेक्षा जास्त उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका यशस्वी फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. अंशुल मिश्रा (Anshul Mishra) असं या तरुणाचं नाव आहे.
बी. टेक. शिक्षण ते फळ शेती (Success Story)
अंशुल मिश्रा हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर येथील रहिवाशी आहे. अंशुल याने सुरुवातीला आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटच्या १६०० रोपांची लागवड करत शेती सुरु केली. या पिकातून त्याला चांगले उत्पन्न मिळाले. यामधून मिळणारे यश पाहता आज त्याने आपल्या 5 एकर शेतीत 20 हजार ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे अंशुल मिश्रा याने चेन्नई येथून बी. टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता त्याने शेती करण्याचा पर्याय निवडला. हा निर्णय आज योग्य ठरला असल्याचे तो सांगतो.
शेतीतून मिळतं 25 लाखाचं उत्पन्न
उच्च शिक्षित शेतकरी अंशुल मिश्रा सांगतात, “मी बी. टेक. पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये ड्रॅगन फळाच्या लागवडीस सुरुवात केली. यामधून मला हळूहळू चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यानंतर मी 5 एकरापर्यंत ड्रॅगन फळाची लागवड वाढवली आहे. ड्रॅगन फ्रुटच्या गुणधर्मामुळे या फळाला बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे (Success Story) या फळाला प्रति किलो १५० ते २०० रुपयांचा दर हमखास मिळतो. या शेतीमधून मला ५ एकरातील २० हजार झाडांपासून सर्व खर्च वजा जाता २५ लाख रुपयांची कमाई सहज होते.”
25 वर्षे घेता येतं उत्पन्न (Success Story)
तरुण शेतकरी अंशुल मिश्रा शेतकऱ्यांना आणि तरुणांना सल्ला देताना सांगतात; “ड्रॅगन फळाची शेती ही माळरान जमिनीवर देखील केली जाऊ शकते. ठिबक सिंचन व्यवस्था केल्यास या पिकाला पाणी देखील खूप कमी लागते. याशिवाय या पिकाच्या लागवडीतून, एकदा लागवड केल्यानंतर पुढील 25 वर्ष उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ड्रॅगन फळाच्या लागवडीकडे वळण्याची गरज आहे. इतकेच नाही तर पारंपारिक पिकांऐवजी फळ पिकांना प्राधान्य देण्याची गरज आहे;” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com