यशोगाथा: गरीब टॅक्सी चालकाचा मुलगा बनला आयएएस; जाणून घ्या अझरुद्दीन काझी यांची संघर्षगाथा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की, यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. केवळ परिश्रम आणि परिश्रम करून माणसाला यशाची चव चाखता येते. आम्ही तुम्हाला यशस्वी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. आज अशी व्यक्ती आहे ज्यांनी जीवनातील सर्व संकटांना पराभूत करून यशाची चव घेतली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ येथे राहणाऱ्या अझरुद्दीन काझी यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपल्या गरीब वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

अझरुद्दीन काझी यांचे वडील जहीरुद्दीन काझी पेशाने टॅक्सी चालक होते. वडिलांच्या टॅक्सीतून मिळणाऱ्या कमाईतूनच अझरुद्दीन यांच्या आई आणि चार भाऊ यांचे जीवन चालू होते. अझरुद्दीन हे त्याच्या चार भावांमध्ये मोठे आहेत. एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या आईलाही शिक्षणाची आवड होती. मात्र लहान वयातच लग्न झाल्यामुळे तिला अभ्यास पूर्ण करता आला नाही. पण आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा त्यांचा निर्धार होता. घरात पैशाची कमतरता भासत होती, परंतु आपल्या अंतःकरणात मुलांना शिकवण्याची आणि सक्षम बनवण्याची आईची इच्छा त्यापेक्षा खूप मोठी होती. आईने दहावीपर्यंत घरीच चारही मुलांना शिकवले कारण असे की त्याच्याकडे कोचिंग किंवा शिकवणीचे पैसे नव्हते. नंतर अझरुद्दीन यांनी वाणिज्य विषय निवडला आणि पदवी पूर्ण केली. घराला आर्थिक मदत देण्यासाठी अझरुद्दीन यांनी खासगी नोकरीदेखील केली. दरम्यान 2010 मध्ये अझरुद्दीन यांनी दिल्ली येथे जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले.

पण दिल्लीला जाण्यासाठी अजरुद्दीन यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पैसे मिळताच त्यांनी रेल्वेचे तिकिट घेतले आणि ट्रेनमध्ये उभे राहून दिल्लीचा प्रवास पूर्ण केला. येथे आल्यानंतर त्यांनी विनामूल्य कोचिंग फॉर्म भरला जो यूपीएससी इच्छुकांची विनामूल्य तयरी करवून घेतो. त्यांची येथे निवड झाली. परंतू पहिल्या काही प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश न मिळाल्यानंतर त्यांची सरकारी बँकेत पीओ म्हणून निवड झाली. चांगली नोकरी मिळाल्यानंतर अझरुद्दीनच्या घराची परिस्थिती सुधारली. परंतु युपीएससी काही केल्या त्यांच्या डोक्यातून निघत नव्हती. शाखा व्यवस्थापक पदावर पोचल्यानंतर अझरुद्दीन यांनी ही नोकरी सोडली आणि त्यानंतर सिव्हिल सेवेची तयारी सुरू केली. यानंतर ते पुन्हा या परीक्षेत नापास झाले. पण अखेर 2019 मध्ये त्यांची मेहनत पार पडली आणि त्यांची निवड झाली. अझरुद्दीन 2020 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी झाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com