करिअरनामा ऑनलाईन | कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलीला जगविख्यात adobe कंपनीने (Success Story) तब्बल 60 लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॉम्प्युटर इंजिनियरचे शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टॅलेंट पुढे आले असून अनामिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परमनंट जॉब
कोल्हापूरच्या सोनाळी या छोट्याशा गावातली अनामिका डकरे ही आता जगविख्यात adobe कंपनीत टेक्निकल ऑफिसर पदावर कार्यरत होणार आहे. तिच्यातले टॅलेंट पाहून कंपनीने तिला वर्षाला तब्बल 60 लाखांची ऑफर दिली आहे. अनामिकाचे वडील शिक्षक तर आई गृहिणी अशा कुटुंबातून ती पुढे आली. अनामिका डकरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
इंटर्नशिपमुळे मिळाली संधी (Success Story)
अनामिकाने कॉम्प्युटर इंजनिअरिंग क्षेत्रात आपला डंका कायम ठेवला आहे. शिक्षण घेत असतानाच तिला adob कंपनीने इंटर्नशिपची संधी देत महिन्याला एक लाखाचे विद्यावेतन दिले. ही इंटर्नशिप संपताच तिला 60 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर कायमस्वरूपी नेमणूक दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला मिळालेली ही सर्वात मोठी ऑफर आहे. त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांचे टॅलेंटही आता जगभर पोहोचले आहे. तिच्या या यशाबद्दल कॉलेजचे ट्रस्टी, माजी (Success Story) मंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. तर कॉलेजच्या प्राचार्यांनी तिच्याविषयी अभिमान व्यक्त केला आहे.
अनामिकाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरले आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com