करिअरनामा ऑनलाईन । यंदाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री (Success Story) नित्या मेननला तिरुचित्रंबलम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेली नित्या दोन-चार नव्हे तर 6 भाषा अस्खलितपणे बोलते. अभिनयासह ती तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. एवढच नाही तर पत्रकार होण्यासाठी तिने पत्रकारिता आणि जनसंवादाचाही अभ्यास केला आहे. पण नशिबाने यू टर्न घेतला आणि ती चित्रपट क्षेत्रात आली.
अभिनेत्रीने केला आहे पत्रकारितेचा अभ्यास (Success Story)
नित्या मेनन (Nithya Menon) हिचा जन्म आणि पालनपोषण बेंगळुरू, कर्नाटक येथे झाले आहे. सध्या ती कुटुंबासोबत तिथेच राहते. तिचे पालकही बंगळुरूमध्येच जन्मले आणि वाढले आहेत. नित्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. नित्याने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने मणिपाल विद्यापीठातून पत्रकारिता आणि संप्रेषणाचे शिक्षण घेतले. पण तिच्या नशिबात काही वेगळेच होते. तिने सिनेमॅटोग्राफीच्या पुढील अभ्यासासाठी अर्ज केला. जेव्हा नंदिनी रेड्डी यांनी तिला पाहिले आणि तिला अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. 2011 मध्ये तिचा पहिला तेलुगु चित्रपट ‘अला मोडालैंधी’ प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली.
८ व्या वर्षापासून केलं चित्रपटात काम
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी (Success Story) निवड झालेल्या नित्या मेननला तिचा पहिला चित्रपट ऑफर करण्यात आला होता जेव्हा ती 8 वर्षांची होती. फ्रेंच दिग्दर्शक आणि वन्यजीव चित्रपट निर्माते फ्रेडरिक फोगिया यांनी दिग्दर्शित केलेला ‘हनुमान’ हा इंग्रजी चित्रपट होता. नित्याने 2020 पर्यंत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविध उद्योगांमध्ये ही ती काम करत आहे. प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या, नित्याने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायिका म्हणून तिचा आवाज देखील दिला आहे. 2019 मध्ये ‘फ्रोझन 2’ साठी तेलुगुमध्ये एल्साच्या पात्रासाठी तिने डब देखील केले आहे. ती एक उत्कृष्ठ गायिका देखील आहे आणि तिने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.
तिरुचित्रंबलम या चित्रपटाचे कथानक मिथ्रन आर यांनी (Success Story) लिहिले होते. हा चित्रपट जवाहर यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये धनुष, नित्या मेनन, भारतिराजा, प्रकाश राज, राशी खन्ना आणि प्रिया भवानी शंकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. नित्या मेनन हिने प्रथमच हा पुरस्कार पटकावला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com