Success Story : उच्च शिक्षीत तरुणीनं 1 कोटींचं पॅकेज नाकारुन सुरु केला व्यवसाय; आज आहे 50 कोटींची मालकीण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी होण्यासाठी रिस्क घेणारे (Success Story) लोक फारच कमी असतात. फार कमी लोक असे असतात जे जोखीम पत्करून यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात. जेवढी मोठी रिस्क तितके जास्त मोठे यश असते. आरुषीने असंच काही करून दाखवले आहे. आरुषीने फक्त एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. आज करोडपती लोकांमध्ये आरुषीची गणना केली जाते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आरुषीने तब्बल एक कोटी रुपयांची नोकरीची ऑफर धुडकावली होती. आरुषीने सुरू केलेल्या ‘TalentDecrypt’ या स्टार्टअपचे मूल्य आता कित्येक पटीने वाढले आहे. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आरुषीने खूप मेहनत घेतली. तिच्या या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत.

मित्रवर्ग आणि कुटुंबाने आरुषीला वेड्यात काढले
प्रत्येक तरुणाचे कोट्याधीश बनण्याचे स्वप्न असते. अनेक वर्ष अभ्यास करून, मेहनत घेवून एखाद्याला जर एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले तर सोन्याहून पिवळेच म्हणावे लागेल. आजच्या कथेतील आरुषी अग्रवाल ही तरुणी गाझियाबादची रहिवासी आहे. तिने नेहमी इतरांपेक्षा वेगळे स्वप्न पाहिले. शिक्षण पूर्ण केल्यावर (Success Story) आरुषीला एक नव्हे तर दोन कंपन्यांकडून एक कोटींच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर मिळाली, पण आरुषीने कोट्यवधी रुपयांची नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. यासाठी तिने अवघ्या एक लाख रुपयाची गुंतवणूक केली. व्यवसायाच्या सुरुवातीला मित्र आणि कुटुंबाने आरुषीला वेड्यात काढले पण अवघ्या चार वर्षात आरुषीने मिळवलेले यश पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

कोण आहे आरुषी अग्रवाल (Success Story)
मूळची मुरादाबादची रहिवासी असलेल्या आरुषीने नोएडा येथील एका खासगी महाविद्यालयातून बी. टेक आणि एम. टेकचे शिक्षण घेतले आहे. 2018 च्या शेवटी आरुषीने कोडिंग शिकून सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली आणि मेहनतीच्या जोरावर आरुषीने अवघ्या दीड वर्षात टॅलेंटडिक्रिप्ट सॉफ्टवेअर तयार केले ज्याच्या बळावर आरुषीने कोट्याधीशाचा टॅग मिळवला आहे. आरुषीला भारत सरकारच्या NITI आयोगाकडून देशातील 75 महिला उद्योजकांपैकी एका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

करोडोंचे पॅकेज नाकारले
आरुषीने आयआयटी दिल्ली येथून सॉफ्टवेअर डेव्हलपरचे प्रशिक्षण (Success Story) घेतले आणि येथून इंटर्नशिपही पूर्ण केली. त्यानंतर दोन कंपन्यांकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या जॉब ऑफर तिला मिळाल्या. पण नोकरी करण्याऐवजी स्वतःचे काम सुरू करण्यावर तिने भर दिला.

कोरोना काळात संधी शोधली
2020 मध्ये संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना संकटाच्या काळात आरुषीने स्वतःसाठी संधी शोधली. आरुषीने जोखीम पत्करली आणि केवळ एक लाख रुपये गुंतवून ‘TalentDecrypt’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले. हे सॉफ्टवेअर तरुणांना नोकऱ्या शोधण्यास मदत करते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कोडिंग शिकणाऱ्या तरुणांच्या वास्तविक कौशल्यांनुसार नोकरी शोधल्या जातात.

कंपनीमध्ये काय काम चालतं?
आरुषीची ‘TalentDecrypt’ ही कंपनी आहे. ही कंपनी तरुणांना (Success Story) मनाप्रमाणे नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करते. सध्या अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, यूएई, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ इत्यादी देशांमधील 380 कंपन्या आरुषीच्या कंपनीच्या सेवेचा लाभ घेत आहेत. या कंपनीत तरुणांना हॅकाथॉनद्वारे आभासी कौशल्य टेस्ट द्यावी लागते. आतापर्यंत टॅलेंटडिक्रिप्टच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com