करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा देवून देशाच्या (Study Material for UPSC) सरकारी सेवेत अधिकारी होण्याचं अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. यासाठी ते जीवतोड मेहनत घेताना दिसतात. पण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं. यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पुस्तकांची योग्य निवड करणे. आजकाल बाजारात इतकी पब्लिकेशन्स आणि विविध लेखकांची नवनवीन पुस्तके येत असतात की, यातून पुस्तकांची नेमकी निवड करणे कठीण होऊन जातं.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन भरपूर अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. पण एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी चांगल्या पुस्तकांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. IAS परिक्षेत टॉपर्स ठरलेले उमेदवार शिफारस करतात की प्रथम NCERTच्या पुस्तकांमधून यूपीएससीची तयारी सुरू करावी. यानंतर संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा.
पूर्वी ज्यांनी आय.ए.एस. परीक्षेमध्ये उत्तम यश संपादित केलं आहे, अशा यशस्वी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची प्रत्येक आय.ए.एस. परीक्षार्थीची इच्छा असते. म्हणूनच, यूपीएससी टॉपर्सनी सुचवलेली, काही पुस्तकांची यादी येथे आम्ही देत आहोत, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आय.ए.एस.ची प्राथमिक परीक्षा पास केलेल्या टॉपर्सनी कोणती (Study Material for UPSC) पुस्तके वाचली असावीत? यूपीएससीची प्रिलीम पास करण्यासाठी कोणत्या पुस्तकांची जास्त आवश्यकता आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी यूपीएससी सारख्या सगळ्यात कठीण परीक्षेत यशस्वी ठरलेल्या लोकांना फॉलो करणे हा पर्याय योग्य ठरू शकतो. आपण इथे पाहणार आहोत; परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तके वाचायला हवीत याविषयी…
सीसैट (CSAT)
1. टाटा मैकग्रा हिल सीसैट मैनुअल
2. वर्बल और नॉन वर्बल रीजनिंग- आरएस अग्रवाल
सॉल्व पेपर
इतिहास (Study Material for UPSC)
1. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडेंस – बिपिन चंद्र
2. इंडियन आर्ट एंड कल्चर – नितिन सिंघानिया
3. एनसीईआरटी 11वीं (प्राचीन और मध्यकालीन इतिहास)
4. एनसीईआरटी 12वीं (आधुनिक भारतीय इतिहास)
भूगोल
1. सर्टिफिकेट फिजिकल जियोग्राफी- जीसी लिओंग (G C Leong)
2. एनसीईआरटी VI – X (पुराना पाठ्यक्रम)
3. एनसीईआरटी XI, XII (नया पाठ्यक्रम)
4. वर्ल्ड एटलस (ओरिएंट ब्लैक स्वान)
इंडियन पॉलिटी
1. इंडियन पॉलिटी- एम लक्ष्मीकांत
2. एनसीईआरटी IX-XII
इंटरनेशनल रिलेशन
1. एनसीईआरटी XII (समकालीन विश्व राजनीति)
2. सामयिकी
इकोनॉमिक्स
1. इंडियन इकोनॉमी- नितिन सिंघानिया (Study Material for UPSC)
2. इकोनॉमिक्स डेवलपमेंट एंड पॉलिसीज इन इंडिया- जैन एवं ओहरी
3. एनसीईआरटी XI
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com