करियरनामा ऑनलाईन। भारतात सर्वात जास्त सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणारा आयोग म्हणून एसएससी आयोग ओळखला जातो. (Staff Selection Commission) सरकारची विविध मंत्रालय असो, विभाग किंवा कार्यालय या सर्वांसाठी नोकर भरती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या आयोगाच्या खांद्यावर असते. मोठ्या संख्येने सरकारी नोकरी लागण्याची संधी असल्याने या परीक्षांचा अभ्यास अनेक विद्यार्थी करत असतात. मात्र आयोग अंतर्गत भरपूर परीक्षा होत असून यांची पदं सुद्धा निरनिराळी असतात. म्हणुनच या एसएससी कडून भरण्यात येणारी शासकीय पद कोणती असतात? त्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची असते? याच सगळ्या प्रश्नांची उत्तर खालील माहितीतून मिळणार आहे.
SSC कडून आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षा –
1) संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (CGL – Combined Graduate Level)
- पदवीधर उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.
- यात असिस्टंट, इन्स्पेक्टर, ऑडिटर, कर सहाय्यक इत्यादी पदांची भरती केली जाते.
2) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL – Combined Higher Secondary Level)
- 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी.
- यात लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक, इत्यादी पदांची भरती केली जाते.
3) SSC MTS (Multi-Tasking Staff) (Staff Selection Commission)
- यामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध कार्यकारी पदांसाठी भरती केली जाते.
4) SSC JE (Junior Engineer)
- इंजिनिअरिंग पदवी असलेल्या उमेदवारांसाठी.
- या परीक्षेद्वारे अभियंता पदासाठी निवड केली जाते.
5) SSC Stenographer
- शॉर्टहँड (स्टेनो) शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी.
- सरकारी विभागांमध्ये स्टेनोग्राफर पदांसाठी भरती केली जाते.
SSC च्या प्रमुख परीक्षा (Staff Selection Commission)
1) Tier-I (Preliminary Exam)
- कंप्युटर आधारित चाचणी.
- सामान्य बुद्धिमत्ता, गणितीय क्षमता, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान.
2) Tier-II (Main Exam)
- अधिक सखोल परीक्षा, जसे की गणित, इंग्रजी, स्टॅटिस्टिक्स (विशेष पदांसाठी).
3) Tier-III (Descriptive Paper)
- इंग्रजी किंवा हिंदी मध्ये निबंध लेखन, पत्र लेखन.
4) Tier-IV (Skill Test)
- काही पदांसाठी कौशल्य चाचणी, जसे डेटा एंट्री, कंप्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट.
SSC चे कार्यक्षेत्र –
SSC देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये परीक्षा घेतो. देशाच्या विविध मंत्रालयांमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाते.
- वित्त मंत्रालय
- गृह मंत्रालय
- विदेश मंत्रालय
- आयकर विभाग
- केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI)
पात्रता आणि निवड प्रक्रिया –
- SSC मध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांना पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, आणि राष्ट्रीयता इत्यादी निकष पूर्ण करावे लागतात.
- प्रत्येक परीक्षा प्रक्रियेमध्ये निवडीसाठी टियर-1, टियर-2, टियर-3 आणि टियर-4 चाचण्या घेतल्या जातात.
SSC साठी अर्ज प्रक्रिया –
1) ऑनलाइन नोंदणी –
- SSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
2) अर्ज शुल्क –
- अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी 100 रुपये असून, महिलांना, SC/ST, PwD आणि माजी सैनिक उमेदवारांना फीमध्ये सूट आहे.
3) परीक्षेची तारीख –
- SSC च्या वेबसाइटवर परीक्षेची तारीख आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख जाहीर केली जाते. उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइट वेळोवेळी तपासात राहावी.
विविध सरकारी पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी SSC एक सुवर्ण संधी आहे. CGL, CHSL, MTS, आणि JE अशा विविध परीक्षांसाठी उमेदवारांना तयारी करून आणि योग्य मार्गदर्शन प्राप्त करून सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवता येतो.
अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी SSC च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट दया.