करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल नुकताच (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना जर का रीचेकिंग करायचे असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात. दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना रीचेकिंगसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाची अधिकृत वेबसाईटverification.mh-ssc.ac.in वर अर्ज करावा लागणार आहे. याबाबतची सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपानेच पैसे भरावे लागणार असून विद्यार्थ्यांना नेट बँकिंगद्वारे देखील पैसे भरता येतील.
या स्टेप्स करा फॉलो – (SSC Results 2023)
1. पेपरच्या गुणपडताळणीसाठी शनिवार दि. 3 जून ते सोमवार दि. 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.50/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.
2. मार्च 2023 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी मागणीसाठी ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन स्वत: जाऊन घेणे आणि पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने झेरॉक्स कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (SSC Results 2023)
3. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या प्रती विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे राहणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
अधिकृत वेबसाईट – verification.mh-ssc.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com