करिअरनामा ऑनलाईन । पोलीस खात्यात अधिकारी होणं हे अनेक (SSC Recruitment 2024) तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकजण आपलं नशीब आजमावत असतात. अशा तरुणांसाठी पोलिस खात्यामध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने PSI पदाच्या 4,187 पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्यासाठी दि. 28 मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे; असं आवाहन करण्यात आलं आहे.
संस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशन
भरले जाणारे पद – सब इन्सपेक्टर, दिल्ली पोलीस आणि CAPF
परीक्षा फी – 100 रुपये (SSC Recruitment 2024)
(महिला अनुसूचित जाती जमाती तसेच माजी सैनिकांना परीक्षा फी नाही)
भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा – (SSC Recruitment 2024)
1. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 04-03-2024
2. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28-03-2024
3. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 28-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
4. ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 29-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
5. अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख – 30-03-2024 ते 31-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
6. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक – 9, 10 आणि 13 मे 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे.
आवश्यक वय मर्यादा – (SSC Recruitment 2024)
1. किमान वय – 20 वर्षे
2. कमाल वय – 25 वर्षे
(अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 02.08.1999 च्या आधीचा आणि 01.08.2004 या तारखेनंतर नसावा.)
भरतीचा तपशील –
1. दिल्ली पोलीस पोलीस उपनिरीक्षक पुरूष – 125 पदे
2. दिल्ली पोलीस उपनिरीक्षक महिला – 61 पदे
3. CAPF मध्ये पोलीस उपनिरीक्षक – 4001 पदे
शारीरिक पात्रता –
पुरुष उमेदवारांसाठी –
1. 100 मीटर शर्यत – 16 सेकंदात
2. 1.6 किलोमीटर धावणे – 6.5 मिनिटांत
3. लांब उडी – 3 संधींमध्ये 3.65 मीटर
4. उंच उडी – 3 प्रयत्नांत 1.2 मीटर.
5. गोळा फेक (16 पौंड) – 3 प्रयत्नांमध्ये 4.5 मीटर.
महिला उमेदवारांसाठी –
1. 100 मीटर शर्यत – 18 सेकंदात
2. 800 मीटर शर्यत – 4 मिनिटांत (SSC Recruitment 2024)
3. लांब उडी – 3 संधींमध्ये 2.7 मीटर
4. उंच उडी – 0.9 मीटर 3 संधींमध्ये
(महिला उमेदवारांसाठी छातीच्या मोजमापाची किमान आवश्यकता नसेल)
सर्व पदांसाठी वैद्यकीय मानके अशी आहेत –
1. डोळ्याची दृष्टी : किमान जवळची दृष्टी N6 (चांगली नजर) आणि N9 (खराब नजर) असावी.
2. दोन्ही डोळ्यांची किमान अंतर दृष्टी 6/6 (चांगली नजर) आणि 6/9 (खराब नजर) असावी.
काही महत्वाच्या लिंक्स – (SSC Recruitment 2024)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com