SSC/HSC Supplementary Exam Schedule : 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना (SSC/HSC Supplementary Exam Schedule) पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 10वी व 12वी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंळाच्या सचिवांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह, ठाणे, कोकण, रायगड विभागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या
राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे दि. 20 जुलै 2023 रोजी होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इयत्ता 10 वी चे पेपर दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी होतील तर 12 वीचे पेपर दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिवांनी दिली आहे.

या विभागातील शाळा राहणार बंद (SSC/HSC Supplementary Exam Schedule)
मुंबईसह कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आहे. कोकणातल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याचा इशारा बघता राज्य सरकारने मुंबई आणि कोकणातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यातील इतर भागांमध्ये स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असंही सरकारकडून (SSC/HSC Supplementary Exam Schedule) स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून कर्नाटक तेलंगणा तसंच इतर शेजारच्या राज्यांशी समन्वय साधण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टी होत असताना गरजेनुसार निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com