SSC HSC Exam : कॉपी करणाऱ्यांना सरकारचा दणका; कडक पोलिस बंदोबस्त अन् झेरॉक्स सेंटर राहणार बंद 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वी व 12 वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे (SSC HSC Exam) गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात सादरीकरण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉपी रोखण्यासंदर्भात अनेक निर्णय घेणता आले आहेत.

महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर (SSC HSC Exam) केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 02 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेचा तपशील पाहू शकतात.

‘कॉपीमुक्त अभियाना’चे नियम असे आहेत – (SSC HSC Exam)

  1. परीक्षेदरम्यान पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे.
  2. 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश दिला जाणार नाही.
  3. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार.
  4. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात यावेत. (SSC HSC Exam)
  5. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जातील.

या अभियानात राज्याचा ‘नोडल अधिकारी’ म्हणून शिक्षण आयुक्त, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच ‘समन्वयक अधिकारी’ म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याच्या अनुषंगाने (SSC HSC Exam) जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे असे मैत्रिमंडळ बैठकीत ठरले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com