करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC HSC Exam) यंदापासून दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे वितरण 10 मिनिटे अगोदर करण्याचा निर्णय रद्द केला आहे. परीक्षा दालनात सकाळच्या सत्रात ११ आणि दुपारच्या सत्रात 3 वाजता प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतील. पेपरफुटी, सोशल मीडियावर होणार गैरवापर अशा घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन बदल करण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
या अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी प्रश्न समजण्यास मदत होत असे. परंतु अनेकदा प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याच्या घटना समोर आल्या. अशा घटनांचा (SSC HSC Exam) विचार करून यंदापासून नियमात बदल करण्याचा मंडळाने निर्णय घेतला. फेब्रुवारी – मार्च २०२३ परीक्षेत आता निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर मिळणारी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती निर्धारित वेळेप्रमाणेच मिळणार आहे.
दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रातील परीक्षा 11 वाजता तर दुपारच्या सत्रातील परीक्षा 3 वाजता सुरु होते. आता सकाळच्या सत्रातील (SSC HSC Exam) विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका परीक्षा दालनात 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात 3 वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण होईल. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च पासून घेण्यात येणार आहे.
परीक्षा कॉपीमुक्त वातारवणात होण्यासाठी राज्य मंडळ विविध उपाययोजना करीत आहे. हा निर्णय त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. मंडळाने म्हटले आहे, दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी (SSC HSC Exam) करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच ते सहा वर्षांपासून देण्यात येत होती. परंतु यामुळे प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांना आळा घालून परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे, बोर्डाने सांगितले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com