करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर (SSC HSC Exam 2023) टांगती तलवार कायम असल्याचे दिसत आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली होती. दरम्यान आता पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीवर संकट ओढावले आहे. जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
जुन्या पेन्शन योजनेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य (SSC HSC Exam 2023) सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यासाठी त्यांनी 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. दरम्यान राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी होणार आहेत. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही या संपात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यात सुद्धा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक (SSC HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर आणि कामावर बहिष्कार घालण्यात आला होता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com