करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी व बारावीच्या (SSC HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावी बोर्ड परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान होणार आहेत तर दहावी बोर्ड परीक्षा दि. १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक २ नोव्हेंबर २०२३ पासून मंडळाची अधिकृत वेबसाई www.mahasscboard.in वर उपलब्ध होणार आहे.
‘या’ तारखेला होणार परीक्षा (SSC HSC Board Exam 2024)
पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) लेखी परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. या आधी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. आज अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व (SSC HSC Board Exam 2024) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे अंतिम असून, सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना हे वेळापत्रक देण्यात आले आहे. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. शिवाय, इतर संकेतस्थळ, अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा व्हॉट्स अॅपच्या Whatsapp च्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरु नये अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळाच्यावतीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com