Spring Break : ऐकावं ते अजबच!! प्रेम करण्यासाठी ‘या’ कॉलेजमध्ये देतात आठवडाभर Holiday

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थीदशेत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आपलं (Spring Break) नातं सगळ्यांपासून लपवून ठेवतात. भारतात प्रेम लपून छपून केलं जातं. त्यामुळे फारशी चर्चा होत नाही. प्रेमाबाबतही अनेक वाद होत असतात. दुसरीकडे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये मुलांच्या जन्मदरात मोठी घसरण झाली आहे, तिथले सरकार आता लोकांना अधिक मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी चीन सरकारही नवनवीन निर्णय घेत आहे. या एपिसोडमध्ये चीनमधील महाविद्यालयांमध्ये काही वेगळे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्याला चीनमध्ये ‘स्प्रिंग ब्रेक’ असे नाव देण्यात आले आहे. एनबीसीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
फॅन मेई एज्युकेशन ग्रुपद्वारे चालवल्या जाणार्‍या नऊ महाविद्यालयांपैकी एक असलेल्या फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने  स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थिनींना विशेषत: प्रेमाचा शोध पूर्ण करण्यास सांगितले आहे. ही बाब लक्षात घेऊन इतर महाविद्यालयांमध्येही 1 एप्रिल ते 7 एप्रिलदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गावर प्रेम करा, जीवनावर प्रेम करा आणि स्प्रिंग ब्रेकचा आनंद घ्या असे सांगितले जाते.

सुट्टीत असतो होमवर्क (Spring Break)
या काळात विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ प्रेमच करावे असे नसून विद्यार्थ्यांना गृहपाठही दिला जाणार आहे. यादरम्यान आलेला अनुभव आणि काम डायरीत लिहावे लागेल. यामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि प्रवासाचा व्हिडिओही बनवावा लागणार आहे.

जन्मदर वाढवण्याचा उद्देश
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जन्मदर वाढवण्यासंदर्भात चीन सरकारने सूचना दिल्या आहेत. यातून प्रेरणा घेऊन चिनी महाविद्यालयांनी हा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये (Spring Break) जन्मदर वाढवण्यासाठी 20 हून अधिक शिफारसी आणल्या गेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत कॉलेजने स्प्रिंग ब्रेक देण्यास सुरुवात केल्याचे वृत्तही काही दिवसांपुर्वी समोर आले होते.
चीनच्या लोकसंख्येवर मोठा परिणाम
1980 मध्ये आणलेल्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे चीनमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. 2021 मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला असून तिथे आता तीन मुलांच्या (Spring Break) जन्मास परवानगी देण्यात आली आहे. आता जन्मदर वाढवणे हा चीन सरकारसाठी मोठा विषय आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com