करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत (Social Media Career) त्याचे स्वरूपही बदलत आहे. सोशल मीडियाचा बदलता पॅटर्न पाहता कॉर्पोरेट जगतालाही त्यावर सक्रिय व्हायचे आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष पदवीची गरज नाही. तुम्ही कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी कोणत्याही पार्श्वभूमीतून आला असला तरीही तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. पण तुमच्यामध्ये काही कौशल्ये असणे आवश्यक आहेत. याबद्दल आज आपण इथे जाणून घेवूया.
सोशल मीडियातील करिअरच्या पर्यायांवर एक नजर
1. सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Career)
सोशल मीडिया मॅनेजर हा कंपनी, ब्रँड किंवा मोठ्या संस्थेच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्रामसारखे सोशल आणि चॅनेल चालवितो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीला पुढे नेण्यासाठी तो नेहमीच नवनवीन मार्ग अवलंबत असतो. यातून त्याला कंपनीची चांगली प्रतिमा बनविता येते. यासाठी तुम्हाला पीआर, जाहिरात, मार्केटिंग आणि सोशल नेटवर्किंगचे स्किल्स येणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर दुतर्फा संवाद साधणाऱ्याचे काम देखील सोशल मीडिया मॅनेजर करतात. कंपन्या त्यांचे ब्रँडिंग करतात, त्यानंतर यूजर्स ब्रँडबद्दल त्यांचे मत व्यक्त करतात. अशावेळी ब्रँड आणि कंपन्यांमधील दुवा बनण्याचे काम ते करतात.
2. सोशल मीडिया विश्लेषक / स्ट्रॅटेजिस्ट
सोशल मीडिया मार्केटिंग कॅम्पेनमधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करणे आणि त्यावर कंपनीची धोरणे ठरवणे हे त्यांचे काम आहे. हे कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार सोशल मीडिया चॅनेल निवडण्यात मदत करतात आणि ब्रँडशी संबंधित ग्राहकांना लक्ष्य करतात.या माध्यमातून ते सोशल मीडिया कॅम्पेनचे (Social Media Career) रिझल्ट पाहतात. सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट मार्केटिंग कॅम्पेन अधिक प्रभावी करण्यासाठी अशा व्यावसायिक सोशल मीडिया प्रोग्रामचा वापर करतात. त्याचे काम वेबसाइट ट्रॅफिकचे निरीक्षण करणे देखील आहे. उदा. प्रत्येक राजकीय पक्षाचा स्वतःचा सोशल मीडिया रणनीतीकार असतो.
3. कंटेट मॅनेजर/क्रिएटर
येथे कंटेटचा अर्थ केवळ लेखी कंटेट असा नाही. ग्राफिक्स, व्हिडिओ, ऑडिओ इत्यादी कंटेट सोशल मीडियावर प्रकाशित केले जातात. यामध्ये करिअरसाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. सोशल मीडिया मॅनेजर सोशल मीडिया सॉफ्टवेअर/प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक बाबींवर अधिक (Social Media Career) लक्ष केंद्रित करत असताना कंटेट प्रोड्यूसर हा कंटेटची भाषा, गुणवत्ता आणि इतर तांत्रिक बाबींवर काम करतो. त्यांच्या विविध कामांमध्ये कॉपीरायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग इ. स्किल्सचा समावेश असतो.
हे आहेत अभ्यासक्रम – (Social Media Career)
या क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स, मास्टर्स इन बिझनेस अॅनालिटिक्स, सर्टिफिकेट प्रोग्राम्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स, डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा, डिप्लोमा इन टेक्निकल रायटिंग इत्यादी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. बर्याच संस्था असे अभ्यासक्रम (Social Media Career) चालवत आहेत. हे सध्या नवीन क्षेत्र आहे, त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्थेत सहभागी होण्यापूर्वी, त्याची ओळखपत्रे तुमच्या स्तरावर तपासा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com