करिअरनामा ऑनलाईन । श्री तुळजाभवानी मंदिर (Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024) संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई या पदांच्या एकूण 47 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट ठरणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ने विविध संवर्गातील पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे ऑनलाईन परीक्षा घेवून ही पदे भरली जाणार आहेत. 10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होत आहे.
संस्था – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर
भरली जाणारी पदे – सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई
पद संख्या – 47 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 23 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज फी – (Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024)
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रुपये 1,000/-
मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी – रुपये 900/-
भरतीचा तपशील –
क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | 01 |
2 | नेटवर्क इंजिनिअर | 01 |
3 | हार्डवेअर इंजिनिअर | 01 |
4 | सॉफ्टवेअर इंजिनिअर | 01 |
5 | लेखापाल | 01 |
6 | जनसंपर्क अधिकारी | 02 |
7 | जनसंपर्क अधिकारी | 01 |
8 | अभिरक्षक | 01 |
9 | भांडारपाल | 01 |
10 | सुरक्षा निरीक्षक | 01 |
11 | स्वच्छता निरीक्षक | 01 |
12 | सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | 02 |
13 | सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | 06 |
14 | सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | 02 |
15 | प्लंबर | 01 |
16 | मिस्त्री | 01 |
17 | वायरमन | 02 |
18 | लिपिक-टंकलेखक | 10 |
19 | संगणक सहाय्यक | 01 |
20 | शिपाई | 10 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
क्र. | पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
1 | सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
2 | नेटवर्क इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
3 | हार्डवेअर इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
4 | सॉफ्टवेअर इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
5 | लेखापाल | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बाणिज्य शाखेतील पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
6 | जनसंपर्क अधिकारी | 1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
7 | जनसंपर्क अधिकारी | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
8 | अभिरक्षक | 1) Possess a graduate degree of recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient History or Ancient Culture or Archaeology 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
9 | भांडारपाल | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील |
10 | सुरक्षा निरीक्षक | ) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 3) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) |
11 | स्वच्छता निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
12 | सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | 1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपन्न |
13 | सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 4) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) |
14 | सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
15 | प्लंबर | 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र |
16 | मिस्त्री | 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र |
17 | वायरमन | 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र |
18 | लिपिक-टंकलेखक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील. |
19 | संगणक सहाय्यक | संगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष अहंता |
20 | शिपाई | माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण |
मिळणारे वेतन –
क्र. | पदाचे नाव | वेतन |
1 | सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | एस-14 (38600-122800 |
2 | नेटवर्क इंजिनिअर | एस-14 (38600-122800 |
3 | हार्डवेअर इंजिनिअर | एस-14 (38600-122800 |
4 | सॉफ्टवेअर इंजिनिअर | एस-14 (38600-122800 |
5 | लेखापाल | एस-13 (35400-112400) |
6 | जनसंपर्क अधिकारी | एस-13 (35400-112400) |
7 | जनसंपर्क अधिकारी | एस-13 (35400-112400) |
8 | अभिरक्षक | एस-13 (35400-112400) |
9 | भांडारपाल | एस-10 (29200-92300) |
10 | सुरक्षा निरीक्षक | एस-10 (29200-92300) |
11 | स्वच्छता निरीक्षक | एस-10 (29200-92300) |
12 | सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | एस-8 (25500-81100) |
13 | सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | एस-8 (25500-81100) |
14 | सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | एस-8 (25500-81100) |
15 | प्लंबर | एस-8 (25500-81100) |
16 | मिस्त्री | एस-8 (25500-81100) |
17 | वायरमन | एस-8 (25500-81100) |
18 | लिपिक-टंकलेखक | एस-6 (19900-63200) |
19 | संगणक सहाय्यक | एस-6 (19900-63200) |
20 | शिपाई | एस-1 (15000-47600) |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024)
5. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
निवड प्रक्रिया –
1. Written Exam
2. Document Verification
3. Final Merit List
अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे –
- प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे,
- अर्ज सादरीकरण
- शुल्क भरणा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.shrituljabhavani.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com