करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेची अधिक चांगली तयारी करता यावी. मूल्यांकन, निकालाच्या प्रक्रियेतील वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांना नियोजन करता यावे; हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
ऑक्टोबरपासून होणाऱ्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक (Exam Time Table) जुलैमध्येच जाहीर केले आहे. कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. त्याचा मूल्यांकन, निकाल जाहीर करण्यासह विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर परिणाम झाला. हे टाळण्यासाठी आणि वेळेत परीक्षा घेण्यासह निकाल जाहीर करण्यासाठी सध्याच्या प्रक्रियेत सुधारणा (Shivaji University) करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने विद्यापीठाच्या परीक्षा नियुक्ती समितीने केलेल्या वेळापत्रकाची तपासणी केली.
या समितीच्या मान्यतेनंतर परीक्षा मंडळाने यापुढे दहावी, बारावीच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षातील सत्राच्या प्रारंभालाच परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्याची हिवाळी सत्रापासून सुरुवात केली. परीक्षा मंडळाने 28 जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर ते जानेवारी या (Shivaji University) कालावधीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा होणार आहेत.
पदवी, पदव्युत्तर परीक्षेच्या तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्याच्या कार्यवाहीचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षेच्या तयारीचे, तर कर्मचाऱ्यांना मूल्यमापन, निकाल, फेरमूल्यांकन प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com