करिअरनामा ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांत पदवी, पदव्युत्तर (Shivaji University) अभ्यासक्रमांच्या परीक्षेत कॉपीचा अवलंब करणाऱ्या 648 विद्यार्थ्यांवर शिवाजी विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने भरारी, बैठ्या पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईने उन्हाळी सत्रातील परीक्षांचा निकाल सरासरी 30 टक्क्यांनी घटला आहे. कोरोनाच्या काळात शिक्षणही ऑनलाईन आणि परीक्षाही ऑनलाईन झाल्या. यामध्ये कॉपी प्रकरणांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.
या प्रकरणांना आवर घालण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने यावर्षी हिवाळी सत्रातील परीक्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 18 परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात केले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १०, सांगली ३ आणि सातारा जिल्ह्यातील ५ केंद्रांचा समावेश होता. या पथकांसह प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी ३ भरारी पथके २५ मे पासून कार्यन्वित ठेवली होती.
त्यानंतर आजअखेर या दोन्ही भरारी पथकांनी एकूण ७७९ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. त्यावर परीक्षा प्रमाद समितीच्या चौकशीनंतर ६४८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. उर्वरीत १३१ जणांच्या कॉपी प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. त्यांची चौकशी गुरूवारी परीक्षा प्रमाद समितीच्या बैठकीत होईल.
कॉपी बहाद्दरांवर अशी झाली कारवाई (Shivaji University)
- शिक्षेचा प्रकार आणि विद्यार्थी संख्या
1. कॉपी करताना सापडलेल्या विषयाची संपादणूक (मिळालेले गुण) रद्द – ४३५ विद्यार्थी
2. संबंधित विषयाची संपादणूक रद्द आणि ५०० रूपये दंड – ११३ विद्यार्थी
3. विषयाची संपादणूक रद्द आणि १००० रूपये दंड – ०१ विद्यार्थी
4. संबंधित परीक्षेची संपादणूक रद्द – ४७ विद्यार्थी
5. परीक्षेची संपादणूक रद्द आणि ५०० रूपये दंड – ०१ विद्यार्थी
6. परीक्षेची संपादणूक रद्दसह पुढील एका परीक्षेस बसण्यास प्रतिबंध – १६ विद्यार्थी
7. परीक्षेची संपादणूक रद्द आणि पुढील दोन परीक्षेस बसण्यास प्रतिबंध – १० विद्यार्थी
8. परीक्षेची संपादणूक रद्दसह पुढील तीन परीक्षेस बसण्यास प्रतिबंध – २० विद्यार्थी
9. निकाल राखीव ठेवणे – ०५ विद्यार्थी
10. भरारी पथकाने कॉपी करताना पकडलेले विद्यार्थी – ५९४ विद्यार्थी
11. बैठ्या पथकांना सापडलेले विद्यार्थी – १८५ विद्यार्थी
कॉपी प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणाला आवर घालण्यासाठी हिवाळी सत्रात प्रायोगिक तत्वावर बैठे पथक १८ केंद्रांवर तैनात करण्यात आले. भरारी पथकाच्या कारवाईने यावर्षी कॉपी करताना सापडणाऱ्यांचे आणि त्यांच्यावरील कारवाईचे प्रमाण वाढले. त्याने कॉपी करणाऱ्यांना निश्चितपणे वचक (Shivaji University) बसण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पातळीवर निकालात ३० टक्क्यांची घट झाली आहे. या दोन्ही पथकांची यापुढील परीक्षेत संख्या वाढविण्याचा विचार आहे; असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संहालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले आहे.
गेल्यावर्षीच्या परीक्षेत भरारी पथकांना ५५० विद्यार्थी कॉपी करताना सापडले होते. त्यापैकी ५०० जणांवर कारवाई करण्यात आली. हिवाळी सत्रातील परीक्षेत कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६४८ वर पोहोचली आहे. त्यात आणखी वाढ होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com