करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांसाठी (Shivaji University Online Degree Certificate) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता शिवाजी विद्यापीठ प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट म्हणजेच तात्पुरते पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार आहे. याद्वारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधून पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीकरिता, व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तथापी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पदवी प्रमाणपत्र स्वीकारलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटची तरतूद विद्यापीठाने केली आहे.
त्याचदिवशी मिळणार सर्टिफिकेट (Shivaji University Online Degree Certificate)
सध्या हे सर्टिफिकेट विद्यापीठातील संबंधित विभागातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येत होते. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याच्या उद्देशाने परीक्षा मंडळाने संबंधित नवी सुविधा सुरू केली आहे. यासाठी विद्यार्थ्याने 130 रुपये शुल्क पेमेंट गेट वेद्वारे भरल्यानंतर आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्याला त्याचदिवशी सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.
‘ऑनलाईन ग्रिव्हेन्स पोर्टल’
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या शंका, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी आता विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी ‘ऑनलाईन ग्रिव्हेन्स पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. या सुविधेमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल, संगणक, लॅपटॉपद्वारे (Shivaji University Online Degree Certificate) नोंद करता येईल. या विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठाला ऑनलाईन स्वरुपात प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सोडवणूक होण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.
या सुविधांसाठीची संगणक प्रणाली कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षा विभागातील आय. टी. सेल यांनी स्वतः विकसित केली आहे. या दोन्ही सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा; असं आवाहन त्यांनी केलं आहे.
ऑनलाईन स्वरूपात प्रॉव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट मिळावी ही मागणी विद्यापीठाकडे केली होती. या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला (Shivaji University Online Degree Certificate) याचा आनंद आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना या सुविधेचा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांचा ताण कमी होऊन त्यांचा इतर विकासात्मक कामात हातभार लागणार आहे. तसेच आर्थिक बचत होणार आहे; अशी प्रतिक्रिया अधिसभा सदस्य अभिषेक मिठारी यांनी दिली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com