Shivaji University : शिवाजी विद्यापीठाची मोठी घोषणा!! ‘या’ विद्यार्थ्यांना फी मध्ये भरघोस सवलत अन् वसतिगृहात मिळणार मोफत प्रवेश

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने एक मोठी घोषणा (Shivaji University) केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान यांसारख्या पदव्युत्तर विभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून खास सवलत देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सूट तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत तर वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतल्या जातात. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना वेळीच सूचना देण्यात येईल. विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजींतर्गत बी.टेक., एम.टेक. तसेच पीएचडी हे इंजिनिअरिंगमधील अभ्यासक्रम राबवले जात असतात. यापैकी बी.टेक. व एम. टेक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकारची एमएचटी-सीईटी सेल ही प्रकिया राबविण्यात येते.

865 गावातील विद्यार्थ्यांना होणार लाभ (Shivaji University)
विशेषतः बी.टेक.प्रवेशाकरिता एमएचटी-सीईटीमार्फत प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रवेश परीक्षेच्या आधारावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांनी पीयुसी गणितसह विज्ञान (बारावी) परीक्षार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारची एमएचटी-सीईटी परीक्षा देणे गरजेचे (अनिवार्य) आहे.

या परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. १ मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी पुढील (Shivaji University) लिंकचा वापर करावा. http://surl.li/qrevw MHT-CET परीक्षा फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास विद्यापीठ प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com