Shikshak Bharti 2024 : मोठी बातमी!! शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता; आचार संहितेमधून मिळाली सूट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र (Shikshak Bharti 2024) पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती राबविण्यात येते. या शिक्षक भरतीसाठी पदवीधर/शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता रखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक नवनियुक्त शिक्षकांना कामावर रुजू होता येणार आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे.

समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार
माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर (Shikshak Bharti 2024) केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक भरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल; असेही सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

शिक्षण विभागातर्फे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल. दरम्यान (Shikshak Bharti 2024) समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे; अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com