Shikshak Bharti 2024 : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मिळणार 604 शिक्षक; यादी जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून (Shikshak Bharti 2024) शिक्षक भरती सुरु आहे. ती म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 जागा भरवण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत आता 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला 604 शिक्षक मिळणार आहेत. तरीही यातील 274 जागा रिक्तच राहिल्या आहेत .राज्याच्या शिक्षण विभागाने ही माहिती पवित्र पोर्टलवर देखील जाहीर केलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 रिक्त जागा आहेत. याची जाहिरात पवित्र पोर्टलवर 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. यासाठी माध्यमिकच्या 56 पदांसाठी, उर्दू भाषेच्या 24 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता राज्याने रिक्त पदाच्या जवळपास 70 टक्के शिक्षकांची पदे (Shikshak Bharti 2024) भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू शाळा शिक्षक भरतीची यादी रविवारी रात्री शासनाने जाहीर केली. परंतु आता मुदत संपल्यावर पूर्ण राज्यात निवड यादी कधी जाहीर होणार. याकडे सगळ्यांचे लक्ष होते परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी यादी जाहीर होईल. अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. शासनाने ही यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये राज्यभरातून 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केल्याचे समोर आलेले आहे.

काही उमेदवार TET परीक्षा नापास (Shikshak Bharti 2024)
पात्र ठरलेले काही उमेदवार टीईटी परीक्षा पास झालेले नाहीत. त्यामुळे आता त्यांची कागदपत्रे तपासताना शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार आहे. परंतु अजून कागदपत्रांची तपासणी कधी करायची हे निश्चित झालेले नाही. ही पडताळणी झाल्यावर जिल्ह्याला नेमके किती शिक्षक मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com