Shikshak Bharti 2023 : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी!! दोन महिन्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात (Shikshak Bharti 2023) शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल; असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरु केली जाणार आहे; असंही त्यांनी सांगितलं.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. जयंत पाटील यांनी लहान शाळा, एक शिक्षकी शाळा बंद करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप केला होता. शाळा बंद केल्यास शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. सत्ताधारी भाजपचे ॲड. आशिष शेलार यांनीही फक्त पंधरा दिवसांत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आल्याकडे लक्ष वेधले.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी शिक्षकांची पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला. यशोमती ठाकूर यांनी स्थलांतरित मुलांचाही प्रश्न उपस्थित केला. राज्यात 3 ते 18 वर्षे वयोगटातील (Shikshak Bharti 2023) शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com