करिअरनामा ऑनलाईन । बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीला अखेर (Shikshak Bharti 2023) मुहूर्त लागला आहे. गेल्या साडेपाच ते सहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. अखेर दि. 1 सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 8 ते 10 हजार पदांची भरती होणार आहे. 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांना ‘पवित्र’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास 70 हजार शाळा असून त्याअंतर्गत 65 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची (Shikshak Bharti 2023) नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबर अखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.
कशी करायची नोंदणी –
सध्या ‘पवित्र’ पोर्टल वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील; असे भरतीचे टप्पे आहेत.
खासगी शाळेतील भरतीविषयी (Shikshak Bharti 2023) –
खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील बिंदुनामावली व संचमान्यतेनुसार जेवढी रिक्त पदे असतील, त्यानुसार त्यांना ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. पण, काही शाळांना आताच्या भरतीत सहभागी होता नाही आले आणि काही दिवसांनी त्यांची पदे रिक्त झाल्यास पुन्हा तीन महिन्यांनी भरतीत सहभागी होता येणार आहे. नवीन बदलानुसार आता खासगी संस्थांमधील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलवरुनच होणार आहे; त्यासाठी तीन उमेदवारांना त्या शाळांवर मुलाखतीसाठी पाठवले जाणार आहे.
जिल्हाअंतर्गत बदली रद्द
प्रत्येक वर्षी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून राबविली जाते. आता ही बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पण, अनेकदा पूर्वीच्या शाळांना पुरेसे शिक्षक होते, पण बदल्यांमुळे तेथे शिक्षक कमी पडतात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यामुळे आता (Shikshak Bharti 2023) नवीन शिक्षक भरतीवेळी उमेदवारांकडून एकाच शाळेवर कायमस्वरूपी नोकरीसाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जिल्हाअंतर्गत बदलीची पद्धत आता बंद होणार आहे; असा प्रस्ताव आहे पण त्यावर अजून निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी आहे शिक्षक भरतीची सद्यस्थिती –
1. शासकीय शाळांची पदे – २३,००० पदे
2. ‘खासगी अनुदानित’ची पदे – ८ ते १० हजार पदे
3. अंदाजे एकूण पदभरती – ३३,००० पदे
4. बिंदुनामावली अंतिम जिल्हा परिषदा – १२ पदे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com