करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी (Sharad Pawar) नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ख्याती आहे. केवळ राज्यच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 12 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांचे पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार हे आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या शिक्षण आणि राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया.
वडील बँक कर्मचारी तर आई गृहिणी
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी बारामती, पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामती शेतकरी सहकारी बँकेत कामाला होते. तर त्यांची (Sharad Pawar) आई शारदाबाई पवार या गृहिणी होत्या. शरद पवार यांना नऊ भावंडे आहेत.
सरकारी शाळेत घेतले शालेय शिक्षण (Sharad Pawar)
बारामती येथील सरकारी शाळेतून शरद पवार यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण (Sharad Pawar) घेतले. दरम्यान 1 ऑगस्ट1967 रोजी प्रतिभा शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून खासदार आहेत.
कॉलेजमध्येच केला राजकारणात प्रवेश
शरद पवार यांनी शिक्षणादरम्यान राजकारणात प्रवेश केला होता. कॉलेजमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि सरचिटणीस बनले. यानंतर शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव यांनी शरद पवारांची क्षमता ओळखून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनवले.
4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
1967 मध्ये बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी 19721972आणि 1978 मध्ये सलग निवडणुका जिंकल्या. शरद पवार 1978 मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर 1988, 1990 आणि 1993 मध्ये ते मुख्यमंत्री राहिले. शरद पवार यूपीए आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.
काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादीची स्थापना
1999 मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. खरे तर या तिघांनीही पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे (Sharad Pawar) देण्यावर आक्षेप घेतला होता. यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. असे असले तरीही शरद पवार यांचा पक्ष विभक्त होऊनही यूपीएचा एक भाग राहिला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com