मुंबई । लॉकडाऊनच्या काळात पालकवर्गाला मोठा दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने पालकांवर नवीन शैक्षणिक वर्ष किंवा मागील शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. या आधी यासबंधी परिपत्रक काढण्यात आले असले तरीही काही शाळा विद्यार्थी व पालकांवर फी भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. याची दखल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली असून अशा शाळांवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून या सबंधी एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आहे. सोबतच ट्विटरवरूनही माहिती दिली आहे.
राज्यातील शाळांकडून विद्यार्थी किंवा पालकांना शुल्काची मागणी होत असल्यास यासंबंधी आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी, असे स्पष्ट आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिले आहेत. तसेच ट्विटबरोबर त्यांनी शासनाचे परिपत्रकही जोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही बहुतांश पालकांनी या बंदीच्या कालावधीत शाळेची फी जमा करण्याचा कालावधी चालू वर्षाकरता तसेच आगामी वर्षाकरता म्हणजेच २०१९-२० आणि २०२०-२१ साठी वाढवून देण्याची विनंती राज्य शासनाकडे केली आहे. लॉकडाउनचा कालवधी संपल्यानंतर शुल्कासंबंधी कार्यवाही करावी या संबंधीचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
#coronavirus च्या पार्श्वभूमीवर राज्यात #Lockdown2 सुरू. या कालावधीत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांना चालू व आगामी वर्षाचे शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये. असे करणाऱ्या शाळांविषयी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी- शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांचे आवाहन pic.twitter.com/CkiJHo9fJB
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असून दीर्घ चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षण व्यवस्थेवरच नाही तर खासगी आणि इतर उद्योग धंद्यांवरही परिणाम झाला असून हातावरचे पोट असणाऱ्यांवर महिन्याचा खर्च चालवणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये सांगत शाळांनी ई लर्निंग द्वारे पुढच्या वर्गातील शिकवण्या सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विशेषतः बड्या व इंग्रजी शाळांकडून पालकांकडे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. कठीण काळ समजून सद्यपरिस्थिती पालकांकडून शुल्क वसूल करण्यात येऊ नये असे परिपत्रक शिक्षण विभागाकडून शाळांना समज देण्यासाठी काढण्यात आले होते. मात्र आठवण म्हणून, या ना त्या मार्गाने पालकांना पुन्हा पुन्हा शुल्कासाठी शाळा पाठपुरावा करत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला आणि शिक्षणमंत्री यांना प्राप्त झाल्या आहेत. याची दखल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली असून अशा शाळांवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी व पालकांना शालेय फी मागणी संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याविषयी तक्रार असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्कसाधावा.@CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks @SATAVRAJEEV @AUThackeray pic.twitter.com/tYY4O3eh5R
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 17, 2020
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com