करिअरनामा ऑनलाईन । फेब्रुवारी 2022 मध्ये राज्य परीक्षा परिषदेकडून (Scholarship Result) इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतिम निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे निकाल समोर आले. यामध्ये इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीच्या 12.53 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
राज्यात इयत्ता पाचवीच्या एकूण 3,82,797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 91,400 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवीच्या 2,79,466 विद्यार्थ्यांनी (Scholarship Result) ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. अर्ज छाननीनंतर अंतिम निकाल 7 नोव्हेंबरला पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम म्हणजे तात्पुरता निकाल जाहीर करण्यात आला होता.
ज्यानंतर दि . 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळांकडून गुण पडताळणीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर अर्ज छाननी करून मंगळवारी अखेर अंतिम निकाल जाहीर केले गेले.
असा पहा निकाल – (Scholarship Result)
विद्यार्थी लॉग इन आयडी वापरून परीक्षेचा निकाल पाहू शकतात. तर, पालकही http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहू शकतात.
कधी होते शिष्यवृत्ती परीक्षा?
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेतली जाते, त्यासाठी डिसेंबर महिन्यात अर्ज मागवले जातात. यंदा मात्र शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणं शक्य झालं (Scholarship Result) नाही आणि म्हणूनच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरातील अनुसूचित जाती- जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते.
मध्यंतरी कोरोना काळात म्हणजेच 2019- 2021 मध्ये शाळा बंद होत्या पण शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु होता या काळात विद्यार्थी आर्थिक (Scholarship Result) अडचणीतही होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 1700 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचं समोर आलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com