Scholarship : भारत सरकार देतंय ब्रिटनमध्ये शिक्षणाची संधी; ‘या’ स्कॉलरशिपसाठी लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षणासाठी खर्च जास्त असल्याने (Scholarship) अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. राहण्यापासून ते कॉलेजच्या फीपर्यंतचा खर्च इतका आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तो परवडत नाही. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही संजीवनी ठरते. जगभरातील विद्यापीठांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते, जी विद्यार्थ्यांच्या फी पासून  राहण्याचा खर्च कव्हर करते. अशीच एक शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. ती कॉमनवेल्थ मास्टर्स स्कॉलरशिप म्हणून ओळखली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ही स्कॉलरशिपसाठी काय असते आणि यासाठी काय पात्रतेचे निकष आहेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…

UK मध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी ‘कॉमनवेल्थ मास्टर स्कॉलरशिप’ दिली जाते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. 2023 कॉमनवेल्थ (Scholarship) मास्टर्स स्कॉलरशिप पुढील वर्षी सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये यूकेमध्ये मास्टर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाईल. ही शिष्यवृत्ती कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (CSC), UK द्वारे भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते.

भारतीय विद्यार्थ्यांना sakshat.ac.in/scholarship या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.  शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत असेल. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, विद्यार्थ्यांना कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशनच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर देखील अर्ज करावा लागेल.

असे आहेत पात्रतेचे निकष (Scholarship)

अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना CSC चे सर्व नियम पाळावे लागतात.

उमेदवारांनी सप्टेंबर 2023 पर्यंत UKमध्ये त्यांचा अभ्यास सुरू करणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीसाठी 39 उमेदवारांचे नामांकन करणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच उमेदवारांच्या निवडीमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नाही, कारण (Scholarship) त्यांची निवड CSC द्वारे केली जाईल. जे उमेदवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत प्रवेश निश्चितीचा पुरावा दाखवतील त्यांना शिष्यवृत्तीसाठी नामांकन केले जाईल. उमेदवारांकडे cscuk.fcdo.gov.uk या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेले विद्यापीठाचे प्रवेश पत्र असावे.

कट-ऑफ तारीख 6 डिसेंबर ठेवली आहे जेणेकरून नामनिर्देशित उमेदवारांची अंतिम यादी 14 डिसेंबरपर्यंत CSC कडे पाठवता येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com