करियरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) SBI Clerk Bharti 2025 ने लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या 14,191 रिक्त जागांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज शुल्काची माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
या जाहिराती अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) SBI Clerk Bharti 2025 या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
पदसंख्या –
लिपिक (कनिष्ठ सहकारी) या पदासाठी 14,191 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वेतन –
या पदासाठी दर महिना रु. 26,000/- ते रु. 29,000 वेतन असणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
- SC / ST – 33 वर्षे
- ओबीसी – 31 वर्षे
- अपंग व्यक्ती (सामान्य) – 38 वर्षे
- अपंग व्यक्ती (SC/ST) – 42 वर्षे
- अपंग व्यक्ती (OBC) – 41 वर्षे
अर्ज शुल्क –
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.750/-
- ST/SC/PWD – शुल्क नाही
अर्ज पद्धती –
उमेदवारांनी SBI Clerk Bharti 2025 या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2025
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://sbi.co.in/