Satara ZP Teachers : सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या; ‘इतक्या’ शिक्षकांना दुसरे गाव गाठावे लागणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद (Satara ZP Teachers) प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 संवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. संवर्ग एक, दोन, तीन व चार, विस्थापित राऊंड व अवघड क्षेत्रातील रिक्त (Satara ZP Teachers) जागा भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन बदलीचे आदेश प्रसिध्द करण्यात आले आहेत.

असे आहेत बदलीचे निकष – (Satara ZP Teachers)
यापूर्वी विविध संवर्गातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण, पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर, एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल (Satara ZP Teachers) तर त्यांना संवर्ग दोनमध्ये प्राधान्य देण्यात आले होते. वरीलप्रमाणे बदली प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com