करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी (Paper Leak) महाविद्यालय, वडगाव येथील परीक्षा केंद्रावर आज (दि. 10) मोठा गोंधळ पहायला मिळाला. सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत परीक्षार्थींना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. शिवाय संतप्त उमेदवारांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंद करुन ठेवल्याचा (Paper Leak) आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेत गोंधळ होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दि. 24 डिसेंबरला परीक्षा झाली होती. त्यावेळी सेटचा (SET) 2019 मध्ये घेण्यात आलेला पेपर जसाच्या तसा आला होता. त्यामुळे 24 तारखेची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या घटनेला अजून 15 दवसही झाले नाहीत तोपर्यंत या परिक्षेत पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला. याप्रकारामुळे परीक्षा पद्धतीवरील पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com