Salary Expectation : तुम्हाला पगार किती हवाय?? गोंधळू नका; या प्रश्नावर ‘हे’ उत्तर द्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही नोकरीसाठी मुलाखत देताना (Salary Expectation) काही प्रश्न खूप कॉमन विचारले जातात. जसं की स्वतःबद्दल काही सांगा किंवा तुम्हाला ही नोकरी का हवी आहे? यामध्ये अजून एक प्रश्न असा असतो जो प्रश्न जवळपास सर्व मुलाखतींमध्ये विचारला जातो, तो म्हणजे “हा जॉब करताना तुम्हाला किती पगार हवा आहे?” हा प्रश्न जरी कॉमन आणि साधा वाटत असेल तरी या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचा पगार अवलंबून असतो. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर अगदी तोलून -मापून आणि अंदाज घेऊन देणं आवश्यक आहे. बरेचजण इथे घाबरतात आणि नाही ते बोलून जातात. पण आता चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला पगरची अपेक्षा किती आहे या प्रश्नाचं उत्तर न घाबरता आणि स्मार्ट पद्धतीनं कसं देता येईल याबद्दल सांगणार आहोत.

बरेचदा या प्रश्नाचं उत्तर देताना अनेकजण आपल्या पोस्टपेक्षा अधिक पगाराची मागणी करतात, यामुळे त्यांच्यात जॉब बद्दलची आवड कमी आहे असं दिसतं. तर काही जण घाबरून पोस्टला मिळणाऱ्या पगारापेक्षा कमी सॅलरी सांगतात त्यामुळे त्यांना कमी पगारात जॉब करावा लागतो. म्हणूनच या प्रश्नाचं चोख उत्तर कसं द्यावं याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊ.

स्वतःला तयार करा (Salary Expectation)

कंपनीचा उद्योग आणि कंपनीचं प्रोडक्शन इथपर्यंत सर्व आवश्यक माहितीसह स्वतःला तयार करा. आवश्यक माहितीबाबत रिसर्च करणं आवश्यक आहे कारण ते तुम्हाला चांगल्या निगोसिएशन करण्यात मदत करेल. जर तुम्हाला कंपनीबद्दल माहिती असेल आणि स्वतःच्या प्रोफाईलबद्दल माहिती असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पगाराबद्दल बोलू शकाल.

यासाठी HR ला आधीच कळवा की तुम्ही योग्य करिअरची दिशा शोधत आहात जी तुम्हाला कंपनीला सेवा देण्यासाठी योग्य ठरेल. पगार किंवा मोबदला यापेक्षा अधिक योग्य (Salary Expectation) नोकरी असणं जास्त आवश्यक आहे. मात्र हे सांगताना पगाराबाबाबत विसरू नका. त्यांना खात्री द्या की तुमच्या गरजा अचूक आहेत आणि तुम्ही पगारासोबतच कंपनीत चांगल्या पद्धतीनं कामही कराल.

विचार करण्यासाठी वेळ घ्या

जर तुम्ही मुलाखतीच्या या भागात या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसाल तर, तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला नोकरी आणि जॉब प्रोफाइलबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे असं सांगून मुलाखत घेणाऱ्यांना काही काळ थांबवू शकता आणि पगाराबतच्या प्रश्नावर विचार करू शकता.

आत्मविश्वासाने परफेक्ट उत्तर द्या

जर तुमच्यात संपूर्णपणे आत्मविश्वास असेल आणि तुम्ही नोकरीसाठी तयार असाल तर मुलाखत घेणाऱ्यांना तुम्हाला जितका पगार हवाय त्याची एक रक्कम सांगा. या पुढे (Salary Expectation) काहीही बोलू नका. तुम्ही सांगितलेली रक्कम ही पूर्णपणे रिसर्च केल्यानंतरच सांगा.अवाजवी रक्कम सांगू नका. तुम्ही सांगितलेली रक्कम बरोबर असेल तर यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास मुलाखत घेणाऱ्यांना दिसेल आणि तुम्हाला हव्या त्या पगारात नोकरी मिळू शकेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com