करिअरनामा ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिल हा जन्मदिवस. गेली दोन-अडीच दशकं क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने आज वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केलंय. क्रिकेटच्या मैदानात सचिनने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. असे असले तरीही सचिन तेंडुलकरच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतली आहे. विराट-धोनी अजूनही क्रिकेट खेळतायत. पण त्यांच्यापेक्षा पण जास्त पैसा सचिन तेंडुलकरकडे आहे. मुंबईतच नाही, सचिनने आणखी एका राज्यात आलिशान बंगला विकत घेतला आहे. जाणून घेवूया सचिनच्या कमाई आणि शिक्षणाविषयी…
सचिनवर त्याचे चाहते इतकं प्रेम करतात की त्याच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती करुन घ्यायची असते. सचिनची पहिली मॅच, रन्सचा रेकॉर्ड, त्याच्या आवडीचे पदार्थ अशा प्रत्येक गोष्टी तोंडपाठ असलेले अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सचिन (Sachin Tendulkar) तेंडुलकर रिटायरमेंटच आयुष्य जगतोय. पण आजही सचिनच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीय. लोक आजही सचिनला मास्टर-ब्लास्टर म्हणूनच ओळखतात.
कॉमन मॅन सचिन (Sachin Tendulkar)
सचिनच आयुष्य एका सर्वसामान्य कॉमन मॅन प्रमाणे सुरु झालं. आजही सचिन कॉमन मॅन सारखाच राहतोय. पण त्याच्याकडे पैसा, बँक बॅलन्स याची अजिबात कमतरता नाही. सचिनच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान लक्झरी गाड्या आहेत. आजच्या यशस्वी क्रिकेटपटूंपेक्षा पण सचिनकडे जास्त पैसा आहे. सचिन तेंडुलकरची नेटवर्थ किती आहे? त्याच्याकडे किती संपत्ती आहे? ते पाहूया
इतकी आहे संपत्ती
भारतीय क्रिकेटचा सम्राट सचिन तेंडुलकरकडे आज कोट्यवधीची संपत्ती आहे. त्याने आपलं काम आणि नावाच्या बळावर कोट्यवधीची संपत्ती जमवली आहे. आज (Sachin Tendulkar) सचिन ज्या स्थानावर आहे, तिथपर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. त्याने 16 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. आज सचिनकडे 1650 कोटींची संपत्ती आहे.
सचिनने खरेदी केलेत आलिशान बंगले
सचिनकडे मुंबईत वांद्रे येथे आलिशान बंगला आहे. त्याची किंमत 39 कोटी रुपये आहे. 2007 मध्ये सचिनने हा बंगला विकत घेतला होता. आता याच बंगल्याची व्हॅल्यू 100 कोटीच्या घरात आहे. त्याशिवाय BKC येथे आलिशान कोठी आहे. त्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. मुंबईशिवाय सचिनने केरळमध्ये सुद्धा एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. त्याची किंमत 78 कोटी रुपये आहे.
सचिनच्या ताफ्यातील लक्झरी कार
सचिनला बंगल्याशिवाय आलिशान लक्झरी कार्सचा सुद्धा शौक आहे. त्याच्याकडे एका पेक्षा एक महागड्या गाडया आहेत. त्याच्याकडे सुरुवातीला मारुती 800 कार होती. आता सचिन 20 कोटीच्या कारमधून फिरतो. सचिनच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये फरारी 360 Moden, BMWi8, BMW7 series 750Li M sport, Nisaan GT-R , Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre या कार्स हेत.
असं मिळालं सचिन हे नांव
24 एप्रिल 1973 रोजी राजापूर येथील मराठी कुटुंबात सचिनचा जन्म झाला. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून रमेश तेंडुलकर यांनी त्याचे नाव ठेवले होते. मोठा भाऊ (Sachin Tendulkar) अजित तेंडुलकरने सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासोबतच नितीन तेंडुलकर आणि सविता तेंडुलकर ही भावंडे आहेत. सचिन तेंडुलकरने 1995 मध्ये अंजली तेंडुलकरसोबत लग्न केले. सचिनला सारा आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.
अवघ्या 15 व्या वर्षी मुंबई संघातून खेळला
प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी सचिनला सक्षम शिक्षण दिले. हॅरिस शील्ड सामन्यात विनोद कांबळीच्या वैयक्तिक 326 धावांसोबत त्याने 664 धावांची विक्रमी (Sachin Tendulkar) भागीदारी केली. आणि वयाच्या 15 व्या वर्षी तो मुंबई संघात सामील झाला होता.
विक्रमवीर सचिन
क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा सन्मान प्राप्त होणारा तो पहिला खेळाडू (Sachin Tendulkar) आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 2008८ मध्ये सचिनला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम प्रस्थापित केले.
कमी शिकल्याची खंत कायम (Sachin Tendulkar)
सचिनने शारदाश्रम विद्यामंदिरात शिक्षण घेतले. तिथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेट जीवनाला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज होण्यासाठी तो एम.आर.एफ. पेस फाउंडेशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाला होता, परंतु तेथे वेगवान गोलंदाजी (Sachin Tendulkar) प्रशिक्षक डेनिस लिली यांनी त्याला पूर्णपणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केल्याने सचिनचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे तो जेमतेम 10 वीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. जास्त शिक्षण घेता न आल्याची खंतही त्याने अनेकदा बोलून दाखवली आहे. असे असले तरी त्याने क्रिकेट क्षेत्राला आपले सर्वस्व मानले आणि तो प्रामाणिकपणे मेहनत करीत राहीला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com