आरटीईतील अंतराची अट यंदा शिथिल ? पालकांमध्ये संभ्रमता

करिअरनामा ।आरटीई अंतर्गत यंदा एकदाच लॉटरी काढण्यात येणार असून, पूर्वी असलेली अंतराची अट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशावेळी गोंधळ होण्याची शक्‍यता आहे.

आरटीई प्रवेशात पूर्वी पहिल्या प्रतीक्षा यादीत शून्य ते एक किलोमीटर अंतरात असलेल्यांना प्रवेश दिला जात होता. त्यानंतर तीन किलोमीटर व तिसऱ्या यादीत सहा किलोमीटर अंतराच्या शाळांसाठी यादी जाहीर केली जात होती. मात्र, यंदा प्रवेश यादी एकदाच तयार होणार असल्याने ती कोणत्या प्रकारे तयार केली जाईल, याची स्पष्टता नाही. उपलब्ध जागांएवढी प्रत्यक्ष निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व तितक्‍याच विद्यार्थ्यांची एक प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.

प्रत्यक्ष निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपल्या विभागातील पडताळणी समितीकडे जाऊन मूळ कागदपत्रे दाखवून प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. शिल्लक जागांवर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी दिली जाईल; परंतु ही यादी कशी बनवली जाणार? याबाबत मात्र संकेतस्थळावर कोणतीही माहिती दिलेली नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsappp करा आणि लिहा “Hellojob”