रेल्वेमध्ये 1036 जागांची भरती; असा करा अर्ज RRB Recruitment 2025

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

रेल्वेतील पीजीटी, टीजीटी, प्रायमरी रेल्वे शिक्षकांसह तब्बल 1036 पदांची बंपर भरती!

करियरनामा ऑनलाईन | दरवर्षी RRB (Railway Recruitment Board) विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करत असते. तसेच या वर्षी देखील रेल्वे बोर्डाकडून RRB Recruitment 2025 तब्बल 1036 पदांची मेगाभरती होणार आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या (Ministerial & Isolated Categorie) अंतर्गत पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 7 जानेवारी 2025 पासून या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार असून संगणक चाचणी नुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पदांसाठी विशिष्ट शैक्षणिक अहर्ता असून त्याचा सविस्तर तपशील खाली नमूद केलेला आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ही बंपर भरती होणार आहे. इतर तपशील खालील प्रमाणे.

पदाचे नाव RRB Recruitment 2025 – पदव्युत्तर शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT), सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III

पदसंख्या – 1036 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवार – रु. 500/-
इतर उमेदवार – रु. 250/- (SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female)

अर्ज पद्धती – ऑनलाईन RRB Recruitment 2025

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी

अर्ज सुरू होण्याची तारीख –07 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.https://rrbmumbai.gov.in/