करिअरनामा ऑनलाईन। आंबानी, बिर्ला, टाटा यांच्याबाबत आपल्याला माहिती असतेच. उद्योग धंद्यांत (Roshni Nadar) ते बाप माणसंच आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका बाईमाणसाबद्दल सांगणार आहोत ज्यांची संपत्ती एकूण तुम्ही अवाक व्हाल. इतकच नाही तर अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून प्रसिद्धी मिळवलीय. कोण आहे हि महिला? त्या नक्की काय काम करतात? त्यांची एकूण संपत्ती किती आहे? हे आपण जाणून घेणार आहोत या लेखामधून…
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या HCL टेक्नॉलॉजिजचे अध्यक्ष शिव नाडार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे पद आपली कन्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांच्याकडे सोपवत असल्याची घोषणा केली. रोशनी यांनी अवघ्या 38 व्या वर्षी तब्ब्ल 65 हजार कोटी रुपयांच्या एचसीएल कंपनीचा कारभार हाती घेतला. रोशनी नाडार-मल्होत्रा या फोर्ब्सच्या शक्तिशाली आणि कर्तृत्ववान महिलांमध्ये 54 व्या स्थानी आहेत. तसेच त्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत.
इतकी आहे रोशनी यांची संपत्ती
एकूण 8.9 अब्ज डॉलर व्यवसाय असलेल्या HCL टेक्नॉलॉजिजचा कारभार यापुढे रोशनी नाडार – मल्होत्रा बघणार आहेत. रोशनी नाडार यांची वैयक्तिक संपत्ती देखील तितकीच प्रचंड आहे. रोशनी नाडार-मल्होत्रा यांची संपत्ती 36,800 कोटी आहे.
शिक्षण किती झाले? (Roshni Nadar)
रोशनी दिल्लीत वाढली आहे. रोशनी यांनी दिल्लीतील वसंत व्हॅलीमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथून त्यांनी कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेतलं आहे. तसेच केलॉग स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची डिग्री घेतली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग इकॉनॉमिक लीडरस् इनिशिएटिव्हमध्येही ती सहभागी झाली आहे.
फोर्ब्सच्या यादीत समावेश
फोर्ब्सने 2017 ते 2019 पर्यंत जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये रोशनी नादर यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. 2019 मध्ये ती या यादीत 54 व्या स्थानावर होती. सन 2019 मध्ये ती (Roshni Nadar) देशातील सर्वात श्रीमंत महिला होती.
शिखर मल्होत्रा जीवन साथीदार
रोशनी यांचा 2010 मध्ये शिखर मल्होत्रा यांच्याशी विवाह झाला आहे. मल्होत्रा HCL हेल्थकेअरमध्ये उपाध्यक्ष आहेत. त्यांना अरमान आणि जहान ही दोन मुले आहेत. शिखर मल्होत्रा रोशनी यांना नेहमीच त्यांच्या कामात प्रोत्साहन देत असतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com