करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या (Rohit Pawar) प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एक आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच सरळसेवा भरतीसाठी राजस्थानच्या धर्तीवर One time registration पद्धत सुरु करावी. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रु. परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
परीक्षेसाठी एस. टी. प्रवास मोफत करण्याची मागणी
राज्यात सद्य स्थितीला वेगवेगळ्या विभागांच्या पदांसाठी सरळसेवा भरतीच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी लांब अंतरावरील परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्याचा मोठा खर्च विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळं सरळसेवा परीक्षासाठी विद्यार्थ्यांना मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होईल असे रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क… pic.twitter.com/z6DOissBso
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2023
1000 रुपयांचे परीक्षा शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अवाक्याबाहेर
सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो. त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते. त्यामुळं एका विद्यार्थ्याला जवळपास 20,000 हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 हजार रुपयाचे (Rohit Pawar) परीक्षा शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याचे पोहित पवारांनी पत्रात म्हटले आहे. राजस्थानच्या धर्तीवर one time registration पद्धत सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रुपये परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती देखील रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
राज्यात सुरु असलेल्या #सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर #पेपरफुटी च्या घटना समोर येत आहेत. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादात #पेपरफुटी वर कडक कायदा आणण्याची #युवा वर्गाची आग्रही मागणी दिसून आलेली आहे. #उत्तराखंड सरकारने आणलेला #कायदा नक्कीच प्रभावशाली आहे. त्याच… pic.twitter.com/eBYZgDJEWJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2023
पेपरफुटीवर कडक कायदा आणा… (Rohit Pawar)
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादात पेपरफुटीवर कडक कायदा आणण्याची युवा वर्गाची आग्रही मागणी दिसून आल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. याबाबत उत्तराखंड सरकारने आणलेला कायदा नक्कीच प्रभावशाली आहे. त्याच धर्तीवर आपल्या राज्यात देखील कडक कायदा आणावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती रोहित पवार यांनी केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com