Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर वायु भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन एअर फोर्स ने त्यांच्या (Agniveer Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर अग्निवीर एअर पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक जारी केली आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

IAF अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. शॉर्ट नोटिसमध्ये पुढे असे लिहिले आहे की; अग्नीवीर वायु सेवा 01/2025 च्या फेज-II चाचणीच्या पहिल्या बॅचचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध आहे. या लिंकवरुन https://agnipathvayu.cdac.in/avregcycle5/candidate/login उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

यापूर्वी जाहीर केलेल्या निवड प्रक्रियेनुसार, भारतीय (Agniveer Recruitment 2024) वायुसेनेच्या अग्निवीरवायू निवड प्रक्रियेत 3 टप्प्यांचा समावेश असेल. ज्यामध्ये फेज 1 ऑनलाइन परीक्षा, फेज 2 ऑनलाइन परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) आणि अनुकूलता चाचणी 1 आणि 2 आणि फेज 3 वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.

वायुसेना अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 असं करा डाउनलोड (Agniveer Recruitment 2024)
1. अग्निवीर वायू सेवा 01/2025 साठी फेज II चाचणी फेरीच्या पहिल्या बॅचसाठी उपस्थित राहिलेले उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण केल्यानंतर त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
2. भारतीय हवाई दल (IAF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://agnipathvayu.cdac.in/.
3. आता होमपेजवर येणाऱ्या घोषणेवर जा.
4. तेथे तुम्हाला अग्निवीरवायू प्रवेश 01/2025 च्या पहिल्या बॅचच्या फेज-II चाचणीसाठी उमेदवारांच्या लॉगिनमध्ये प्रवेश पत्रांची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यावर आवश्यक तपशील टाका आणि लॉगिन करा.
6. लॉगिन केल्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र तुमच्या समोर असेल, आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट काढू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com