CA Foundation Exam 2024 : CA फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सीए फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी (CA Foundation Exam 2024) नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीए फाउंडेशन (CA Foundation) इंटर आणि फायनल विद्यार्थ्यांना मे सत्र परीक्षांचे नोंदणी अर्ज अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन भरता येणार आहेत. इन्सिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे मे २०२४ च्या सत्रासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सीए परीक्षांसाठी (CA Exams) नोंदणी प्रक्रिया सुध्दा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर फाॅर्म जमा करण्यासाठी ३ ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच दि. ३ ते ९ या मार्च (CA Foundation Exam 2024) दरम्यान परिक्षार्थिंना परिक्षेचे शहर, परीक्षेचे माध्यम निवडण्याचा व बदलण्यचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देवून काही बदल नोंदवण्यात आले आहे का? हे पाहाणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे.

काही महत्वाच्या तारखा (CA Foundation Exam 2024)
सीए मे-जून फाउंडेशन कोर्सच्या परीक्षा २०, २२, २४ आणि २६ जून २०२४ रोजी घेतल्या जाणार आहेत. सीए गट १ साठी इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ३,५ आणि ७ मे २०२४ रोजी घेतली जाईल. तर गट २ च्या परीक्षा ९, ११ आणि १३ मे २०२४ रोजी घेण्यात येतील. या व्यतिरिक्त सीए अंतिम गट १ च्या अंतिम परीक्षा २, ४ आणि ६ मे २०२४ रोरजी आणि गट २ च्या परीक्षा ८, १० आणि १२ मे २०२४ रोजी आयोजित केल्या जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com