रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या ९२६ पदांच्या भरती प्रक्रियेत मुदतवाढ !

करिअरनामा । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई आणि नागपूर मिळून एकूण ४३२ रिक्त जागांचा समावेश आहे. हा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२० अशी होती. मात्र आता ती वाढली असून उमेदवारांना २४ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २४ जानेवारी २०२० पर्यंत आपले अर्ज rbi.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक

पद संख्या – ९२६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फीस – अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / एक्सएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५०/- व ओबीसी / जनरल / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. ४५०/-

अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जानेवारी २०२०  २४ जानेवारी २०२० 

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.