करिअरनामा ऑनलाईन । कसबा मतदारसंघातून कॉंग्रेसचे (Ravindra Dhangekar) उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा निर्विवाद विजय झाला आहे. येथे 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लागल्याने या निकालास जास्त महत्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मत मोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. आज आपण रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाविषयी माहिती करून घेणार आहोत…
पुण्यात घेतलं शिक्षण
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दौंड तालुत्यातील नाथाची वाडी येथील मतोबा विद्यालयातून शिक्षण घेतले. रवींद्र धंगेकर हे आठवी (Ravindra Dhangekar) पास आहेत. 1985 दरम्यान त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. रवींद्र धंगेकर हे शेती आणि सोन्याचा व्यवसाय करतात.
अशी आहे राजकीय कारकीर्द (Ravindra Dhangekar)
शिवसेनेतून रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली होती. पण नंतर ते राज ठाकरे यांच्या मनसेत रुळले. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. इथूनच धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावत गेला. मात्र नंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदल करत काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. धंगेकर हे तब्बल 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याकाळात आपण कसब्यामध्ये बरीच विकासकामं केल्याचा दावा ते करतात.
ज्येष्ठ नेते गिरीश बापटांचा प्रभाव
सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला ताकद देण्याची भाजप नेते खासदार गिरीश बापट यांची स्टाईल धंगेकर यांनी अंगिकारली आणि यामुळेच कसब्यात धंगेकरांची ‘आपला माणूस’ अशी ओळख झाली. जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत (Ravindra Dhangekar) सगळंच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात मिळू लागलं. लोकांच्या या छोट्या-छोट्या गरजा ओळखून रवींद्र धंगेकर यांनी काम सुरू ठेवलं. कोणाला दवाखान्यात मदत असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण…रवींद्र धंगेकर यांचा फोन 24 तास चालू असायचा. कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा ‘आपला माणूस’ म्हणून धंगेकर यांनी लोकांच्या मनाचा ताबा घेतला.
लोकप्रिय नेता
प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईनपासून पाण्याच्या समस्येवर रविंद्र धंगेकरांनी समाधानकारक काम केल्याचं येथील नागरिक सांगतात. याच विकासकामांच्या जोरावर ते प्रभागात (Ravindra Dhangekar) लोकप्रिय झाले. त्यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट नवख्या धंगेकरांपुढे अवघ्या 7 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com