करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण होत आलं की प्रत्येकाची (Rashi Bagga 85 Lakh Package) चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी धडपड सुरु होते. तुम्ही शिकत असलेल्या कॉलेज कॅम्पस मधून नोकरीची संधी मिळाली तर सोने पे सुहागा म्हणावा लागेल. महाविद्यालयांमध्ये असे कॅम्पस सिलेक्शन होत असतात; ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आपलं नशीब आजमावतात.
रायपूरच्या (Raipur) एका मुलीने भरगच्च पगाराची नोकरी कॅम्पस सिलेक्शनमधून मिळवली आहे. या विद्यार्थिनीने सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. आयआयटी, आयआयएम किंवा एनआयटी सारखी मोठी डिग्री न मिळवता तिने चक्क 85 लाख पॅकेज मिळवून देणारी नोकरी मिळवून कमाल केली आहे.
राशीची आज सर्वत्र चर्चा होत आहे. कारण IIT, IIM मधून शिक्षण घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना काही लाखांत आणि कोटींमध्ये पॅकेज मिळत असते; हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. पण (Rashi Bagga 85 Lakh Package) अशी कोणतीही पदवी न घेता छत्तीसगड मधील रायपूरमध्ये राहणाऱ्या राशी बग्गा (Rashi Bagga) या विद्यार्थिनील एका कंपनीकडून तब्बल 85 लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे.
इथं घेतलं शिक्षण
इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंफोर्मेशन टेक्नोलॉजी, नवे रायपुर (IIIT-NR) मधील या विद्यार्थिनीला कॅम्पस सिलेक्शनमधून 85 लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. राशीने इंजिनियरिंगमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी राशीला एका कंपनीने 85 लाखांची ऑफर दिली होती पण त्यावेळी तिने स्वतःला आणखी सिद्ध करण्यासाठी ही नोकरी नाकारली आणि अखेर तिला पुन्हा एकदा 85 लाखांची नोकरी मिळाली . याच कंपनीने गेल्यावर्षी याच इंस्टीट्यूट मधील विद्यार्थ्याला 57 लाखांचे पॅकेज दिले होते.
जाणून घ्या राशी बग्गाविषयी (Rashi Bagga 85 Lakh Package)
राशी ही मूळची छत्तीसगड मधील बिलासपुर मध्ये राहणारी आहे. तिचे वडील शरणजीत बग्गा हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. राशी आता ‘IIIT-NR’ मधून इंजिनियर झाली आहे. इंजिनियर होण्याची प्रेरणा तिला तिच्या भावाकडून मिळाली आहे. ती शाळेत असल्यापासूनच प्रचंड हुशार होती. पण आज ती ज्या पदावर पोहोचली आहे ते केवळ तिच्या वडिलांमुळेच; असे ती मानते. कारण इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनीच तिला सतत पाठिंबा दिला. राशी इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षापासूनच इंटरव्हूव ची तयारी करत होती; म्हणूनच तिला हे यश मिळवता आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com