करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेने पॅरा मेडिकल श्रेणी अंतर्गत विविध (Railway Recruitment) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या श्रेणी अंतर्गत, तुम्ही आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, डेंटिस्ट, थेरपिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, फील्ड वर्कर यासह विविध पदांवर नोकऱ्या मिळवू शकता. तुम्हालाही जर रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम त्यासाठीची पात्रता आणि निवड प्रक्रियेची माहिती घेणं आवश्यक आहे; जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही.
पॅरामेडिकल पदांसाठी कोण अर्ज करू शकेल?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त (Railway Recruitment) विद्यापीठ/संस्थेतून संबंधित क्षेत्रात 12वी/व्यावसायिक/तांत्रिक/पदवी/डिप्लोमा/ इ. प्राप्त केलेली असावी. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18/19/20/21/22 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि पदानुसार कमाल वय 33/35/40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पॅरा मेडिकल पदांसाठी अशी होते निवड (Railway Recruitment)
तुम्हालाही रेल्वेमध्ये पॅरा मेडिकल पदांवर भरती व्हायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला संगणक आधारित चाचणी (Computer Based Test) द्यावी लागेल. CBT मध्ये निर्धारित कटऑफ गुण प्राप्त करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करावी लागेल. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल.
असा आहे परीक्षेचा नमुना
1. CBT परीक्षेत, उमेदवारांना 100 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
2. CBT परीक्षेत, उमेदवारांना 100 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
3. यापैकी 70 प्रश्न व्यावसायिक क्षमतेतून, 10 सामान्य जागरुकतेतून, 10 सामान्य अंकगणितातून, 10 सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कातून, 10 सामान्य विज्ञानातून (Railway Recruitment) विचारले जातील.
4. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटे कालावधी दिला जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com