करिअरनामा । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील या महाभयंकर संकटाला तोंड देण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज आहेत. दरम्यान भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना करण्यासाठी रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर केली आहे. दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या सर्व पदांसाठी लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये डॉक्टर्स , नर्सिंग स्टाफ , लॅब असिस्टंट ,रेडिओग्राफर , हॉस्पिटल अटेंडेंट इत्यादी पदांसाठी जागा भरण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांसाठी थेट मुलाखत होणार आहे. विविध पदांसाठी वयाची अट निर्धारित केली आहे. या पदांसाठी 18 ते 50 वयोमर्यादा आहे.
या पदांच्या मुलाखती पुढीलप्रमाणे होणार आहेत, डॉक्टर्स पदांसाठी 15 एप्रिल, नर्सिंग स्टाफसाठी 16 एप्रिल, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउस किपींग, असिस्टंट आदि पदांसाठी 17 एप्रिल रोजी थेट मुलाखत होणार आहे. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी यावे असे आवाहन केले आहे.
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloNews”
खालील विविध जागांसाठी भरती जाहीर झाली आहे –
जळगावात मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात २२ जागांसाठी भरती जाहीर
मुंबई पश्चिम रेल्वे आरोग्य विभागाच्या १२६ जागांसाठी भरती जाहीर
पुण्यात मध्य रेल्वेत विविध पदांच्या ४३ जागांसाठी भरती जाहीर, ७५ हजार पगार
मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांच्या ९२ जागांसाठी भरती जाहीर
मुंबईत मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय सेवेच्या १८८ जागांची भरती जाहीर