करिअरनामा ऑनलाईन। आपल्या देशात सरकारी नोकरीला मिळवण्यासाठी होतकरू तरुणांची (Railway Exams) धडपड सूर असते. त्यामुळेच दरवर्षी लाखो उमेदवार सरकारी नोकरीसाठी अभ्यास करत असतात. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं ही उमेदवारांची पहिली पसंती असते. दरवर्षी रेल्वेच्या जागांसाठी लाखो विद्यार्थी फॉर्म भारतात. मात्र कोणतीही सरकारी परीक्षा पास करून गव्हर्नमेंट जॉब मिळवणं इतकं सोपं नाही. यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि मेहनत करावी लागते. अनेकजण यातच कमी पडतात. म्हणूनच जर तुम्हीही रेल्वेच्या कोणत्याही परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
आधी समजून घ्या अभ्यासक्रम –
परीक्षेचा स्तर कोणताही असो, त्याची तयारी अभ्यासक्रम समजून घेऊनच करायला हवी. RRB ग्रुप डी परीक्षा देण्यापूर्वी, अभ्यासक्रमाचा बारकाईने अभ्यास करा. त्यानंतर एक नमुना तयार करा आणि तयारी सुरू करा. अनेक वेळा लोक अभ्यासक्रम समजून न घेता परीक्षा देतात, त्यामुळे त्यांची मेहनत आणि वेळ वाया जातो.
योग्य नियोजन आवश्यक – (Railway Exams)
- आरआरबी ग्रुप डी परीक्षेची तयारी करताना एक योजना तयार करा आणि अभ्यास करा.
- लक्षात ठेवा ही परीक्षा 100 गुणांची आहे.
- यातील प्रश्नांची संख्याही 100 आहे.
- उमेदवाराला संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 90 मिनिटे दिली जातात.
- ज्या विषयात तुम्ही खूप चांगले आहात त्या प्रश्नांची उत्तरे कमी वेळात तयार करा.
- कमकुवत विषयाला जास्त वेळ द्या.
जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्या –
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना मागील वर्षाचे पेपर सोडवा. यामुळे (Railway Exams) परीक्षेच्या पॅटर्नची योग्य माहिती मिळेल. यासोबतच परीक्षा हॉलमध्ये पेपर कसा सोडवायचा याचा सरावही केला जाणार आहे. जुने पेपर सोडवल्याने तुम्ही परीक्षेसाठी किती तयार आहात याचेही आकलन होऊ शकते.
नोट्स बनवण्यावर भर द्या –
- बहुतांश सरकारी परीक्षांमध्ये मॉक टेस्ट आणि नोट्सचा मोठा वाटा असतो.
- नोट्स हा परीक्षेच्या शेवटच्या वेळेचा सर्वात मोठा साथीदार असतो.
- परीक्षेच्या काही वेळापूर्वी नोट्स वाचल्याने संपूर्ण (Railway Exams) अभ्यासक्रमाचा समावेश होतो आणि तुमच्या कमतरता ओळखण्यास मदत होते.
- त्याच वेळी, मॉक चाचण्यांचा सराव केल्याने तुम्हाला हे समजण्यास मदत होते की कोणत्या विषयांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com