करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची पहिली महिला बॉडी (Priya Singh) बिल्डर प्रिया सिंगने पुन्हा एकदा जगाच्या नकाशात भारताचं नाव कोरलं आहे. थायलंडमधील पट्टाया येथे झालेल्या 39 व्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत प्रिया सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी प्रियाने 2018, 2019 आणि 2020 मध्ये मिस राजस्थानचा किताब पटकावला आहे.
वयाच्या 8 व्या वर्षी झालं लग्न
मूळची राजस्थानमधील बिकानेरची असलेल्या प्रियाचे वयाच्या 8 व्या वर्षी लग्न झाले होते. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रिया सिंगला नोकरी करावी (Priya Singh) लागली. प्रियाने जिममध्ये नोकरीसाठी अर्ज केला. जिथे प्रियाला तीच्या व्यक्तिमत्वामुळे लगेच नोकरी मिळाली. इतरांना व्यायाम करताना पाहून प्रियाने स्वतः जिममध्ये प्रशिक्षण घेतले. वेगवेगळ्या स्पर्धांमधून तीने चमकदार कामगिरी केली आणि ती आता राजस्थानची पहिली यशस्वी महिला बॉडी बिल्डर बनली आहे.
दोन मुलांची आई (Priya Singh)
इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट प्रिया दोन मुलांची आई आहे. प्रिया म्हणते की पुरुषापेक्षा स्त्रीला तिचे शरीर तयार करण्यासाठी अधिक आहार आणि मेहनत घ्यावी लागते. प्रियाला तीच्या यशात कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे ती आज हे यश मिळवू शकली आहे.
दलित असल्यामुळे सन्मान न मिळाल्याची खंत
दलित कुटुंबातून आलेल्या प्रियाची कहाणी ऐकून सर्वांनाच (Priya Singh) अभिमान वाटेल, पण एवढं मोठं पदक जिंकूनही प्रियाला दुर्लक्षित केलं जात असल्याची तक्रार होत आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकूनही प्रिया सिंगला सरकार किंवा क्रीडा प्रेमींकडून योग्य सन्मान मिळाला नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com