Prison Police Bharti 2023 : राज्याच्या कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल 2 हजार रिक्त पदे भरणार 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कारागृहात तब्बल दोन हजार (Prison Police Bharti 2023) पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली 2 हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारागृह विभागात तब्बल 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी दोन हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी दोन हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. जे उमेदवार पोलिस विभागात काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी नोकरीची ही मोठी संधी आहे.

कारागृह आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची होणार भरती (Prison Police Bharti 2023)
नवीन भरती प्रक्रियेमध्ये कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या अधिक ठेवण्यात आली आहे. मागील वर्षभरात विविध आजारांनी 120 कैद्यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी कैद्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
कारागृह विभागाकडे 1200 संगणकाची मागणी
गुप्ता म्हणाले, पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनविण्यात येणार आहेत. शिवाय आणखी 2 नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात (Prison Police Bharti 2023) आला आहे. उद्योजक सायरस पूनावला यांनी येरवडा आणि कोल्हापूर येथील कारागृहातील 10 हजार कैद्यांना रोज गरम पाणी देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. तसेच राज्यातील कारागृह विभागाकडे 1200 संगणकाची मागणी आली असून ती लवकर पूर्ण केली जाणार आहे.

कारागृहात लावले जाणार 12 हजार ड्रोन
राज्यातील 12 कारागृहात सुरक्षा मजबूत करण्यासाठी ड्रोन लावण्यात येणार आहेत. राज्यातील कारागृहाच्या आतील परिसर तसेच कारागृह शेती परिसर विस्तीर्ण असून या (Prison Police Bharti 2023) परिसरातील कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व सुरक्षा व्यवस्था बळकट राखण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com